अकोला:-
हर घर दुर्गा या अभियाना अंतर्गत शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबीर मुली, तरुणी आणि महिलांसाठी स्थानिक भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, गोडबोले प्लॉट,डाबकी रोड येथे 1 मे पासून प्रारंभ झाले.
या शिबीर कालावधीत शालेय मुलीं, तरुणी आणि महिलांना लाठी-काठी, दांडपट्टा, भाला, ढाल-तलवार, धनुष्य बाण, बाणा, खंजीर लढत, एअर गन इत्यादी प्रशिक्षण नरसिंह आखाड्याचे प्रशिक्षक श्री रवी सोरटे गुरुजी, हर घर दुर्गा समितीचे सूरज वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
शिबीराचे उदघाटन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मार्गदर्शिका आदरणीय सौ. सुहासिनीताई धोत्रे,सौ. मंजुषाताई सावरकर, सौ. सीमाताई मांगटे पाटील,सौ. चंदाताई शर्मा, सौ.सुमनताई गावंडे आणि सौ. वैशालीताई शेळके यांच्या हस्ते दिप प्रज्वलन,परम पवित्र भगवा ध्वज पूजन, शस्त्र पूजन, भारत माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी रश्मी कायंदे, रंजना विंचनकर, माधुरी क्षीरसागर आणि ज्योतीताई रानडे हे मंचावर उपस्थित होते
समिती चे संयोजक श्री सूरज वाडेकर आणि समिती चे मार्गदर्शक श्री. राम भिरड यांचा भाजपा महिला मोर्चा तर्फे सन्मान करण्यात आला.
मुलींनी आजच्या काळात शस्त्र पारंगत होणे व प्रत्येक स्त्री सक्षम होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यावेळी उदघाटनपर बोलतांना सौ.सुहासिनीताई धोत्रे यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी यशस्वीते साठी कु. अबोली तारापुरे, शुभ्रा मुदगळ, मैथिली मुदगळ, अपूर्वा डोंगरे, अवंतिका घाटे, एश्वर्या सुरळकर, शीतल आखरे, प्रणाली प्रांजळे, अक्षरा ताले, शिवकालीन युद्धकला प्रशिक्षणासाठी हर घर दुर्गा च्या सर्व दुर्गा कार्यरत आहेत
शिबीरात 150 च्या वर मुली, तरुणी आणि महिलांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....