यवतमाळ जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात सक्रिय, राष्ट्रीय थ्रोबॉल, डॉजबॉल, स्क्वॅश रॅकेट प्रशिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीराज (बंटी) गणेश वंदना गुप्ता यांची भारतीय जनता पार्टीच्या क्रीडा सेल यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. त्यांची कार्यक्षमता, खेळाडूंप्रती असलेली बांधिलकी, आणि पक्षनिष्ठा लक्षात घेत ही पुनर्नियुक्ती निश्चितच उल्लेखनीय ठरते.
नुकतीच जिल्हाध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार. अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनात नियुक्ती देण्यात आली.
मा. ॲड. प्रफुल्लसिंह चव्हाण भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. हंसराज भैय्या अहीर, आदिवासी विकास मंत्री मा. अशोक उईके, माजी मंत्री मा. मदन येरावार, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, लोकनेते आणि माजी आमदार अप्पासाहेब पारवेकर, आमदार राजू तोडसाम, समन्वयक नितीन भुतडा, यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या
बंटी गुप्ता हे स्वतः राष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी १६ वेळा थ्रोबॉल राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर डॉजबॉल या खेळात राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवून प्रशिक्षक म्हणून राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या क्रीडा शिक्षणातील कामगिरीमुळे त्यांना राज्याचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक सहभाग, संघटन कौशल्य, आणि युवकांमध्ये ऊर्जा निर्माण करणारी शैली यामुळे ते पक्षांतर्गत तसेच क्रीडाविश्वातही लोकप्रिय आहेत.
भारतीय जनता पार्टीचे “शिस्त, संघटन आणि सेवा” हे ब्रीद अंगीकारत त्यांनी नेहमीच पक्षाच्या धोरणांना प्राधान्य दिलं आहे. खेळाडूंच्या हिताचे निर्णय, राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन, प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू घडविणे अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या योगदानामुळे जिल्ह्यातील युवा वर्गाला त्यांनी दशा आणि दिशा दोन्ही दिली आहे. याचबरोबर भाजपाचे जिल्हा कार्यकारिणीची नवनियुक्त यादी जाहीर करण्यात आली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....