पुणे दि. राज्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये महानगरपालिका .जिल्हा परिषद .नगर परिषद .नगर पंचायत. आणि पंचायत समिती .निवडणुकीमध्ये बहुजन जनता दल आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युती संदर्भात पुणे नवी पेठ येथील एम एम जोशी सभागृह येथे गुरुवार दि २३जुन२०२२ रोजी माजी खासदार प्रा जोगेंद्र कवाडे राष्ट्रीय अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि पंडितभाऊ दाभाडे संस्थापक अध्यक्ष बहुजन जनता दल यांच्या मध्ये झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात झाली असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी सांगितले आहे
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या ,राज्यस्तरीय कोर कमिटीची मंगळवार दिनांक ५ जुलै २०२२ रोजी औरंगाबाद येथे बैठक होणार असून या बैठकीमध्ये बहुजन जनता दल आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राज्यस्तरीय युती संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा जोगेंद्र कवाडे यांनी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान सांगितले आहे असे बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडितभाऊ दाभाडे यांनी म्हटले आहे
पीपल्स रिपब्लिकन पार्टी ,भारतीय राष्ट्रवादी पार्टी ,रिपाई सेक्युलर (रिपाई बी सी कांबळे गट )आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनेशी आणि समविचारी पक्षांना सोबत घेऊन आघाडी स्थापन करून राज्यात होणाऱ्या महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद ,पंचायत समिती नगर पंचायत,आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहोत असे हि बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित भाऊ दाभाडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे