शिर्डी येथील साईबाबांचे,स्थानिक साईभक्तांनी कारंजा शहरातील पहिले स्वतंत्र असे,साईबाबा वाटिका मंदिर,कारंजा शहरातील बालाजी नगरी-२ येथे उभारलेले असून,त्या मंदिरात मागील- ४-५ वर्षापासून,साईबाबांची नित्यपूजार्चना,प्रार्थना व दर गुरुवारी सायंकालिन महाआरती नंतर अन्नदान-महाप्रसाद केला जात होता.आता साईबाबांच्या प्राणप्रतिष्ठाचे निमित्ताने,त्र्यंबकेश्वर नाशिक येथील पंचमुखी हनुमान आश्रमाच्या प्रमुख विश्वस्त ब्रम्हचारिणी साध्वी महंत भगवद दास श्री श्री विजयादेवी यांच्या पवित्र पावन सान्निध्यात, येत्या फाल्गुन कृ १४ सोमवार दि.२० मार्च ते चैत्र शु ०६ सोमवार दि.२७ मार्च २०२३ पर्यंत दररोज दुपारी ०१ : ०० ते ०४ : ०० श्रीवृंदावन धाम,साध्वी हभप चित्राश्री माऊली वाकडे (मोहगव्हाण ता. कारंजा) यांच्या सुमधूर अशा अमृतमय वाणीतून संगीतमय श्रीमदभागवत कथा होणार आहे.तसेच दररोज सकाळी ०५ : ०० ते ०६ : ०० वाजेपर्यंत काकड आरती ; सकाळी ०९:०० ते ११:०० व सांयकाळी ०५:०० ते ०६ : ३० विविध भजनी मंडळाची सेवा ; सायंकाळी ०६:३० ते ०७ :३० हरिपाठ ; रात्री ० ८ : ३० ते १० : ३० किर्तन किंवा प्रवचन सेवा राहील. हरिपाठसेवा श्री संत लष्करी महाराज हरिपाठ मंडळ, किन्ही रोकडे यांचेकडून तर श्रीमद्भागवत कथेकरीता वृंदावननिवासी साध्वी चित्राश्री माऊली वाकडे यांना आणि इतरही कार्यक्रमांना साथसंगत गायनाचार्य कन्हैय्यालाल महाराज अरक व रवी महाराज इंगळे, वणी (वारूळा) ; मृदंगाचार्य म्हणून श्याम महाराज डुकरे, सनगाव, प्रल्हाद महाराज जोंधळे, मोऱ्हळ ; तबला - मनोजभाऊ संपळे ; आर्गन - अमोलभाऊ पिसे ; ऑक्टोपॅड - रोशनभाऊ कडू (अमरावती); गायिका - कु आशाताई ढोरे (मानोरा) यांची असेल. सप्ताहामध्ये अनुक्रमे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार हभप गुणवंत महाराज विठोलीकर, बालकिर्तनकार हभप कु. साक्षीताई दिगंबर लुंगे (पारवा), बालकिर्तनकार हभप वैभव महाराज ठिलोरीकर सप्तखंजेरी प्रबोधनकार यावर्डी, हभप माणिक महाराज भगत इत्यादी माऊली कडून साईचरणी किर्तनसेवा होईल.

शनिवार दि . २५ मार्च रोजी पंचमुखी हनुमान आश्रम खंबाले इंदोरे त्र्यंबकेश्वर रोड नाशिक येथील साध्वी महंत भगवद् दास त्यागी श्री श्री विजयादेवी यांचे अमृतमय वाणीतून साईचरित्र कथन होईल. सप्ताहात, श्री साईबाबा महिला भजनी मंडळ, बालाजी नगरी भाग-२ कारंजा, जय गुरुदेव सेवा मंडळ कारंजा ; वनदेवी महिला भजनी मंडळ कारंजा ; श्री गजानन भजनी मंडळ कारंजा ; ओम महिला भजनी मंडळ कारंजा ; श्री गुरु गजानन भजनी मंडळ सुंदर वाटिका कारंजा; विघ्नहर्ता भजनी मंडळ - मराठा सेवा संघ कारंजा ; श्री जलाराम गुजराती महिला भजनी मंडळ कारंजा ; शारदा भजनी मंडळ.बालाजी नगरी - १, कारंजा ; श्री गजानन महिला भजनी मंडळ सातपुते ले आऊट कारंजा ; माहेश्वरी राजस्थानी महिला भजनी मंडळ कारंजा इत्यादी मंडळे साईचरणी भजनसेवा समर्पित करतील.तर रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी सांय. ०५ : ०० वाजता, शिर्डी निवासी साईबाबांच्या पादुकांची भव्य मिरवणूक (नगरपरिक्रमा) होईल तर सोमवार दि.२७ मार्च रोजी सकाळी १०:०० ते १२:०० पर्यंत, हभप पंकज महाराज आळंदीकर यांचे गोपालकाल्याचे किर्तन व त्यानंतर दुपारी ०१:०० ते ०५ :०० वाजेपर्यंत,कारंजेकर साईभक्तांकरीता भव्य अशा महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, असे वृत्त श्री साईबाबा वाटिका मंदीर महोत्सव समितीच्या वतीने, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट (श्री साईबाबा वाटिका मंदिरचे) अध्यक्ष किशोर धाकतोड (गुरुजी) आणि विश्वस्त मंडळींनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद आणि करंजमहात्म्य पारिवाराचे अध्यक्ष संजय कडोळे यांना प्रसिद्धीकरीता दिलेली असून पंचक्रोशितील साईभक्तांनी या न भुतो न भविष्यती साई महोत्सव सोहळ्याचे साक्षिदार होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव पूजाविधी.
कारंजा : श्री साईबाबा वाटिका मंदिर बालाजी नगरी नं. १,बायपास कारंजा येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये,चैत्र शु चतुर्थी दि.२५ मार्च रोजी श्री गणेश पूजन,पुण्याह वाचन,मातृकापूजन ; चैत्र शुद्ध पंचमी दि २६ मार्च रोजी होमहवन,दशविध स्नान,जलाधिवास,शयनाधिवास इत्यादी पूजा पार पडणार असून, चैत्र शुद्ध षष्ठी दि २७ मार्च २०२३ रोजी श्री साईबाबा यांच्या मुर्तिचा प्राणप्रतिष्ठा विधी, होमहवन आणि पूर्णाहूती पंडित सुमित शास्त्री बोंडे यांचेकडून संपन्न होणार आहे. तसेच इंझा वनश्री येथील वैराग्यमूर्ती संत श्री समर्थ सद्गुरू कैलास महाराज यांच्या शुभहस्ते श्री साईबाबा मंदिराचे कलशारोहण होणार असल्याचे बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट (श्री साईबाबा वाटिका मंदिर ) कारंजाचे अध्यक्ष किशोर धाकतोड (गुरुजी) यांचेकडून कळविण्यात आलेले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....