गडचिरोली: सुरजागड येथील लोह उत्खनन करून त्याची वाहतूक केली जात आहे. या वाहतुकीमुळे अनेक अपघात घडत आहेत तसेच रस्ता कोंडीची अडचण निर्माण होत आहे. सुरजागड लोहखनिज कंपनीला सध्या महाराष्ट्रातील तसेच केंद्र सरकारची साथ असल्यामुळे लोहखनिज ओवरलोडिंग व अवैध वाहतूक केली जाते. आज सुद्धा या वाहनाला साईडला आपटून दोन युवकांचा अनकोडा या गावात अपघात झाला. हा अपघात अनकोडा येथे सायंकाळी ७:०० वाजताच्या सुमारास घडला. हे दोन्ही युवक कढोली-रामपूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी होते. या अपघात्तात हे दोन्ही युवक गंभीर जखमी आहेत. सध्या त्यांच्यावर चंद्रपूर जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. सुरजागड लोहखनिज वाहतुक करणाऱ्या वाहनाच्या चुकीच्या पद्धतीने पार्किंग केल्यामुळे हा अपघात घडून आला तसेच या दोन्ही युवकांना आर्थिक मदत कंपनी प्रशासनाकडून देण्यात यावी. मदत न मिळाल्यास चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असा इशारा कढोली या ग्रामपंचायतच्रे सदस्य श्री.श्रीकृष्णा वाघाडे यांनी केला आहे. त्यांनी या सर्व प्रकरणात पोलिस आणि उप-प्रादेशिक परिवहन विभागाने अवैध पार्किंग असलेल्या तसेच ओवरलोडिंग वाहनावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.