जिल्ह्यातील गडचिरोली तालुक्यात जेप्रा या नदीघाटातून मागील तीन ते चार महिन्यांपासून अवैधरित्या वाळू उत्खनन व वाहतूक केले जात असून वाळू तस्कर जोमात तर प्रशासन कोमात अशी अवस्था झाली आहे.परंतु याकडे स्थानिक प्रशासन, तलाठी,मंडळ अधिकारी तसेच तहसीलदार यांचेकडून कमालीचे दुर्लक्ष दिसून येत आहे..या परीसरात अशी चर्चा आहे की हे वाळू उत्खनन व वाहतूक महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू आहे.या अवैध वाळू वाहतूक ही गावातून होत असल्यामुळे उत्खनन करणाऱ्या वाहनाच्या आवाजामुळे लहान मोठ्या साधी सुखाची झोप सुद्धा घेता येतं नाही. त्यामूळे गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .जेप्रा नदिघाटात राजरोसपणे अवैध वाळू तस्कर महसुल विभागाच्या आशीर्वादामुळे कोणालाही न जुमानता दिवस-रात्र वाळू उत्खनन करून वाहतूक करतात .या सर्व भोंगळ कारभारामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. या अवैध वाळू तस्करांच्या मुसक्या कोण आवळणार..?या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.