वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत राज्यातील गुरव व विरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीन विकास व आर्थिक उन्नतीसाठी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुप्त युवा अर्थिक विकास महामंडळाची स्थापना शासनाने केली आहे.या महामंडळाचे कामकाज हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत कार्यान्वित करण्यात आले आहे.तरी या महामंडळाच्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त गुरव (शैव गुरव)व विरशैव लिंगायत बुरड,वाणी समाजाच्या लाभार्थ्यांनी घ्यावा.असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,चिखली रोड वाशिम येथे संपर्क साधावा.असे वृत्त मिळाल्याचे आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.