कारंजा (करंजमहात्म्य वृत्तसेवा) : कारंजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी कारंजा येथील वेदांत पब्लिक स्कूल नजीकच्या इमारतीच्या प्रस्तावित जागेत पार पडणार असून,सदर शीलान्यास समारंभ मा. न्यायमूर्ती श्री नितीन वा.सांबरे उच्च न्यायालय मुंबई यांच्या शुभहस्ते तर मा. न्यायमूर्ती श्री गोविंद आनंदराव सानप उच्च न्यायालय मुंबई तथा पालक न्यायमूर्ती वाशिम जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थित होत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाशिम जिल्हा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय शिरीषकुमार वसंतराव हांडे राहणार आहेत.
कारंजा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी वरिष्ठ न्यायालयाच्या या प्रस्तावित इमारतीला इमारतीला दि. 4 ऑक्टोबर 2024 रोजी प्रशासकीय मंजुरी प्रदान झाली असून कारंजा मूर्तीजापूर रोडवरील वेदांत पब्लिक स्कूल नजीकच्या प्रशस्त जागेत आकारास येणाऱ्या या न्यायालयीन इमारतीमुळे कारंजाच्या सौंदर्यात भर पडणार असून या इमारतीमध्ये एकूण सात कोर्ट हॉल,लोक अदालत, पोस्ट ऑफिस,रेल्वे रिझर्वेशन सुविधा,मध्यस्थी केंद्र सुसज्ज असे वकिलांकरीता ग्रंथालय व आसन व्यवस्था या व्यतिरिक्त उपहारगृह, स्वच्छतागृह अशी सर्व सुविधायुक्त न्यायालयीन इमारत कारंजा येथील वकील पक्षकार मंडळींना न्याय अधिक सुकर होण्याच्या दृष्टीने लवकरच आकारास येणार असून उद्या होणाऱ्या या शिलान्या समारंभाची जय्यत तयारी प्रशासकीय पातळीवर व कारंजा बार असोसिएशन तर्फे सुरू असून या कार्यक्रमाचे निमंत्रक कारंजा तालुका विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष एड. निलेश श्रीधर पाटील (कानकिरड )तसेच मा. पंडित दगू देवरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी कारंजा हे आहेत. अशी माहिती स्वतः एड. निलेश पाटील कानकिरड यांनी महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे प्रसिद्धी करीता दिली आहे.तरी मान्यवरांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.