ब्रम्हपुरी:-तालुक्यापासून 45 किलोमिटर अंतरावर असलेल्या कुडे सावली गावात सध्या जोरात दारू विक्रीचे अवैध धंदे सुरू आहेत त्यामुळे गावात शांतता भंग होऊन अल्प वहिन मुले दारूच्या आहारी जात आहेत.गावात अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून ग्राम पंचायत च्या माध्यमातून दारू विक्री करणाऱ्यांना नोटीस देऊनही काही मुजोर विक्रेते मानायला तयार नाहीत उलट त्यांच्या कडून दारू बंद करणाऱ्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे गावकरी आक्रमक भूमिका घेत सर्व महिला व पुरुष मंडळीच्या सह्या घेऊन अवैध दारू विक्री बंद करा चे निवेदन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ विनोद झोडगे,शिवसेना उप जिल्हाप्रमुख मिलिंद भन्नारे,तालुका प्रमुख नरू नरड, किसान सभेचे कॉ महेंद्र द्यानवाडकर, कुडेसावली येथील तंटा मुक्ती अध्यक्ष रवींद्र उंदिरवाडे,सरपंच चक्रधर गुरणुले,देवराव ननावरे,राजेश्वर शेंडे यांच्या नेतृत्वात दि 4 नोव्हेंबर 2022 रोजी ठाणेदार मा रोशन यादव यांना देऊन अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार गावातील सर्व महिला बचत गट,महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या संयुक्त विद्यमाने 75 व्या अमृत महोत्सव निमित्ताने आपल्या गावाचा सर्वांगीक विकास व्हावा गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून सदैव शांतता नांदावी ,येणारी भावी पिढी चांगली निर्माण व्हावी या उद्देशाने गावकरी एकत्र येऊन या पुढे गावातील शासकीय कार्यालये,धार्मिक स्थळांच्या परिसरातील खुलेआम सुरू असलेली अवैध दारू विक्रीस प्रतिबंध करण्याचे व तात्काळ अमल बजावणी होण्याकरिता गावात जनजागृती करण्यात आली .त्याचाच एक भाग म्हणून गावातील 5 अवैध दारू विक्रेता सोबत चर्चा केली असता त्यांच्या सहकार्याने गेल्या कित्येक वर्षांपासून शासकीय कार्यालये धार्मिक स्थळांच्या परिसरातील खुलेआम सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद झाली.
मात्र याला श्री भगवान तेजू उंदीरवाडे हे अपवाद आहेत .ते महिला बचत गटाच्या महिलाना व तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देतात. व मी दारू विक्री बंद करणार नाही, तुमच्याने जे जमते ते करा म्हणून अजूनही राजरोसपणे दारू विक्री करतच आहेत.वारंवार सांगूनही ते मानण्याच्या स्थितीत नसल्याचे व आम्हचे कोणीच वाकडे करू शकत नसल्याचे त्याला वाटत आहे.अवैध दारू मुळे तरुण,लहान बालके,त्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे गावात भविष्यात तंटे ,भांडणे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तेव्हा येत्या 5 दिवसात शासकीय कार्यालये धार्मिक स्थळांच्या परिसरातील खुलेआम सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी अन्यथा गावकऱ्यांना प्रशासनाच्या विरोधात लोकशाही सदनशिर मार्गाने तीव्र आंदोलन छेडल्या शिवाय पर्याय नाही असा गर्भित इशारा भाकप नेते कॉ विनोद झोडगे ,सरपंच चक्रधर गुरणुले, तंटामुक्ती अध्यक्ष रवीं उंदीरवाडे व गावकऱ्यांनी दिला आहे.यावेळी ठाणेदार मा रोशन यादव यांनी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी तातडीने प्रयत्न करणार असल्याचे ठोस आश्वासन दिले आहे.