कारंजा लाड : कारंजा तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना DNE 136 ची नवीन कार्यकारणीची निवड आज दिनांक 10 जुलै 2025 रोजी पंचायत समिती कारंजा येथे आज माननीय जिल्हाध्यक्ष श्री अमोल भाऊ बळीरामजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व लेखापरीक्षक श्री नरेश चक्रधर गजभिये,जिल्हा संघटक कुमारी गोकर्ण जाधव मॅडम हे उपस्थित होते .
आज गुरुपौर्णिमेच्या औचित्यावर झालेल्या ग्रामपंचायत अधिकारी संघटना DNE 136 कारंजा तालुका कार्यकारी संघटना खालील प्रमाणे स्थापन करण्यात आली.
अध्यक्षपदी सतीश दादाराव वरघट, सचिवपदी सचिन हरिराम राठोड, महिला उपाध्यक्ष पदी कुमारी वर्षा पांडुरंग काकड, उपाध्यक्ष पदी महेश रामचंद्र राऊत, कोषाध्यक्ष श्याम योगीराज वेलुकार, प्रसिद्धि प्रमुख -संजीव रामचंद्र मनवर,संघटक -मनोज कांतीकुमार मोहाळे, कायदेशीर सल्लागार-गजेंद्र बापूराव पाखरे, लेखा परिक्षक -दीपक पांडुरंग रोकडे,निमंत्रक -कुमारी छाया जगन्नाथ टाके,निमंत्रक -कुमारी वैशाली तुळशीराम कांबळे,मानद अध्यक्ष -देवा भाऊ गुणवंतराव राठोड, तर कार्यकारी अध्यक्षपदी धनंजय माणिकराव चौधरी यांची निवड करण्यात आली.सदर तालुका कार्यकारणी करता माजी अध्यक्ष गव्हाळे साहेब तसेच राज्य प्रतिनिधी अजय कुमार ढोके, नंदकुमार रंगे साहेब व माजी सचिव बलदेव चव्हाण व राजेश हवा साहेब यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी सचिव बलदेव चव्हाण यांनी केले व सर्व सर्व कारंजा तालुका ग्रामपंचायत अधिकारी. संघटना DNE 136 कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.