सध्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरु असून,या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास (रोजा) ठेऊन आपल्या पवित्र नमाजाचे पठन उत्साहने करतात.तसेच शहरात रमजान ईदचा त्यौहार अतिशय आनंदोत्साहात साजरा होऊन या दिवशी हिंदुमुस्लिम बांधव एकमेकांना रमजान ईद निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत असतात.तसेच पोलीस स्टेशन कारंजा कडूनही या सणानिमित्ताने दरवर्षीप्रमाने इफ्तार पार्टीचे आयोजन करून शुभेच्छा देण्यात येत असते. त्याचमुळे यावर्षी सुद्धा कारंजा (लाड) शहर पोलिस स्टेशनतर्फे, स्थानिक महेश भवन येथे बुधवार दि.१९ एप्रिल रोजी इफ्तारपार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस जिल्हा अधीक्षक बच्चनसिंग हजर होते तर प्रमुख उपस्थितीत होम डी वाय एस पी कार्तिका मॅडम,उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, पोलीस निरिक्षक आधारसिंग सोनोने,माजी नगराध्यक्ष अरविन्द लाठिया,शहरे काजी इक़बाल मौलाना,व नगीना मस्जिदचे मौलवी हजर होते.सर्वप्रथम मान्यवराचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.नंतर इफ्तार पार्टी सुरु करण्यात आली त्यानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,
राजकीय कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष अरविंद लाठीया, शहरे काजी इकबाल मौलाना, नगीना मास्जिदचे मौलवी साहब, जाकीरभाई, डॉ.इम्तियाज लुलानिया, मोहम्मद मुन्निवाले, दिलीप भोजराज, राधाताई मुरकुटे (मॅडम)यांनी आपले विचार मांडले. व आम्ही कारंजेकर सर्वधर्मिय एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होऊन एकमेकांना सहकार्य करून आमच्या गावाची शांतता अबाधित रहावी म्हणून एकमेकांना सहकार्य करीत असतो व करीत राहू याची ग्वाही दिली. शिवाय कारंजा शहर पोलिस स्टेशनचे कर्तव्यनिष्ठ पोलिस निरिक्षक आधारसिंग सोनोने यांनी नेहमीच पोलिस प्रशासन-शांतता कमेटी-थेट जनता यांच्याशी समन्वय व संवाद ठेवून आपल्या कर्तव्यावर जबाबदारीने लक्ष्य केन्द्रित केले असल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. रमजान ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्यात.आणि कारंजा शहर पोलिस स्टेशनच्या इफ्तार पार्टीच्या सुंदर नियोजना बद्दल प्रशंसा केली.यावेळी अध्यक्षीय संभाषनातून बोलतांना जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी बैठकीत "सर्वानी शांतता का पाळावी ? या विषयाची चर्चा व्हायला नको. कारण बैठकीत येणारे सर्व जण शहरातील शांतता कायम ठेवण्यासाठी उत्तम कार्य करणारे मान्यवर असतात.केवळ औपचारिता म्हणून आपण वागणे सोडले पाहिजे.समाजात जे काही विघ्न संतोषी लोकं असतात त्यांना आवर घालणे हे समाजातील प्रत्येक जाणकार-समजदार माणसाचे कर्तव्य आहे.आपण सारे समाजात काम करणारी जबाबदार पदाधिकारी,राजकिय, सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार, धार्मिक कार्यकर्ते असल्याने आपण अशा लोकांचा बंदोबस्त करून पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.शहरातील शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम आपल्या हातून झाले पाहिजे.तरच बैठकिचा उद्देश सफल होईल.प्रत्येक समाजात शांततेत सण उत्सव साजरा करा असे म्हणतात.खरे तर शांतता पाळणे ही समाजात राहणाऱ्या प्रत्येकाची नैतिक जवाबदारी आहे.समाजामध्ये विघ्नसंतोषी असतात.परंतु वरिष्ठांनी त्यांचेवर नियंत्रण ठेवून शांताता राखलीच पाहीजे.व पोलिस प्रशासनाला सहकार्य केले पाहीजे." असे आवाहन अधीक्षक बच्चनसिंग यांनी केले. तसेच येणाऱ्या रमजान ईद निमित्य सर्वाना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वधर्म आपात्कालीन संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई यांनी तर आभार प्रदर्शन कारंजा (लाड) शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांनी केले.या वेळी इफ्तार पार्टीत बहुसंखेने मुस्लिम बांधव,सर्व समाजाचे सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,महिला समिति प्रतिनिधी,मोठ्या संख्येने हजर होते.असे वृत्त प्रत्यक्षदर्शी असलेले महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.