स्व. किसनराव दादा हुंडीवाले यांच्या स्मृती प्रीत्यर्थ महाराष्ट्र गवळी समाज संघटनेद्वारे नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,या कार्यक्रमात कारंजा गवळीपुरा येथील रेहान रमजू खेतिवाले याने वैद्यकिय प्रवेश पूर्व नीट परिक्षेमध्ये 720 पैकी 642 गुण मिळवून यश संपादन केल्यामुळे प्रमुख पाहुन्याचे हस्ते शाल,पुष्पमाला व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.हयावेळी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश अध्यक्ष हिरामणआप्पा गवळी, प्रदेश महासचिव अशोक मंळले,प्रदेश युवक अध्यक्ष प्रवीण हुंडिवाले,प्रदेश उपाध्यक्ष कासम नौरंगाबादी,विभागीय प्रमुख टीकाराम बरेठिया,विभागीय प्रसिद्धि प्रमुख प्रा. सी.पी.शेकुवाले, अकोला जिल्हाध्यक्ष शंकरराव बिडकर,वाशिम जिल्हाध्यक्ष जुम्मा बन्दूकवाले,जिल्हा सचिव सुभान चौधरी,पूर्व जिल्हाध्यक्ष राहेमान नंदावाले, हाजी कय्यूम जट्टावाले,प्रा. हसन कामनवाले,यूसुफ खेतिवाले,सलीम शेकुवाले,कासम भवानीवाले, जब्बार पप्पूवाले,गालिब पटेल,सह संघटनेचे पदाधिकारी व समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.तसेच माजी जिल्हाध्यक्ष अड़. सुभान खेतिवाले,रहेमान शेकुवाले,प्रा. बदरुद्दीन कामनवाले यांनी सुद्धा रेहान रमजू खेतिवाले यांचा सत्कार करून त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेला प्राप्त झाल्याचे वृत्त जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी दिले आहे.