कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : अन्नदाता शेतकर्याने शेतीची मशागत करून तो आभाळाकडे पावसाची आर्त याचना करीत असतानाच, 04 जुलै 2023 रोजी दुपारी 04:00 वाजता,कारंजा शहर व कारंजा परिसरातील पंचक्रोशीच्या ग्रामीण भागात अचानक, ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. यावेळी मौजे येवता (बंदी) पिंप्री वरघट शिवरस्त्यावरील पांदण रस्त्याने, मृतक शेतकरी स्व. विष्णू महादेव हागोणे वय अंदाजे 55 हे आपल्या शेतामधील शेतीचे काम आटोपून आपल्या बैलगाडीने मुलासह घराकडे जायला निघालेले असतांनाच, नाल्याला आलेल्या पावसाच्या लोंढयाने, त्यांची बैलगाडी वाहत जाऊन पल्टी झाली व त्यामध्ये कुटूंबातील कमवित्या कर्त्या शेतकरी स्व विष्णू महादेव हागोणे यांचा अकाली दुदैवी मृत्यु झाला. मात्र ह्या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन कारंजा महसूल विभागाचे तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी विभागातील मंडल अधिकारी कटके आणि तलाठी यांना पंचनाम्याचे आदेश देऊन अहवाल पाठवला.तसेच कारंजा मानोरा विधासभा मतदार संघाचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटणी यांनी सुद्धा,या घटनेची माहिती घेऊन,कारंजा तहसिल कार्यालयाला,मृतक हागोणे यांच्या परिवाराला तात्काळ आपात्कालिन आर्थिक मदत करण्याचे सुचवीले. त्यावर कारंजा तहसिल कार्यालयाचे तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी रितसर कार्यवाही करून व स्वतः जातीने अथक परिश्रम घेऊन, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत, आपत्कालिन आर्थिक सहाय्य मिळवून,रविवार दि. 9 जुलै 2023 रोजी,स्व हागोणे यांचे मृत्युपश्चात,तात्काळ नैसर्गीक आपत्ती मदत निधी म्हणून चार लक्ष रुपयाचा धनादेश,मृतकाचे वारसदार पत्नीला आमदार राजेंद्र पाटणी यांचे हस्ते देण्यात आला .यावेळी तहसिलदार ,ना.तहसिलदार विनोद हरणे, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील ठाकरे,भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे, उपाध्यक्ष राजीव भेंडे,शहराध्यक्ष ललित चांडक, स्विय सहाय्यक संजय भेंडे,तलाठी अमोल वक्ते ,वरघट ,उमक,मं अ कटके सह कर्मचारी व नागरिक उपस्थीत होते.तहसिलदार कुणाल झाल्टे व त्यांच्या सहकारी यांच्या परिश्रमामुळे केवळ चार पाच दिवसातच मृतक शेतकर्याच्या कुटूंबाला आर्थिक मिळू शकली हे येथे उल्लेखनिय म्हणावे लागेल .