एसटी बस व दुचाकी वाहनाच्या धडकेत एक जागीच ठार झाला तर एक जखमी झाल्याची घटना 11 जूनला 8:45 च्या दरम्यान घडली असून एसटी बस ही चिमूर आगाराची आहे. आज दिनांक 11 जून 2023 रोजी सकाळी 08: 45 वाजताच्या दरम्यान चिमूर उमरेड महामार्गावर भिवापूर तालुक्यातील मालेवाडा जवळ एम एच 40 सी एम 4191 क्रमांकाची चिमूर आगाराची बस चिमूरवरून अमरावतीकडे जात असताना एम एच 31 डी जी 4585 क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिल्याने आकाश वाघमारे हा युवक जागीच ठार झाला तर त्याचाच सोबती सत्यवान मूनघाटे हा गंभीर जखमी झाला आहे.. पुढील तपास भिवापूर पोलीस करीत आहे.