श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक,शिक्षण महर्षी आप्पासाहेब सरनाईक यांच्या पुण्यप्रतापाने श्री.शिवाजी संस्था वाशिम,आज अमरावती विभागात अग्रेसर आहे.या संस्थेचा विकास होण्यासाठी माझे पतीदेव श्री. किरणराव सरनाईक यांचे आज मोलाचे योगदान आहे.सरनाईक परिवाराचे ते कुटुंबप्रमुख असून त्याहीपेक्षा ते शिक्षकांचे प्रतिनिधी व शिवाजी परिवाराचे कुटुंब प्रमुख आहेत.आमच्या कुटुंबापेक्षा त्यांनी शिक्षकांना अधिक जवळचे मानले आहे.शिक्षक आणि शिक्षण यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केलेले आहे.शिवाजी परिवार हा त्यांच्या हृदयात आहे.शिक्षण क्षेत्रातले अनेक प्रश्न आज शिक्षक आमदारांचा प्रतिनिधी म्हणून ते सोडवत आहेत.शिक्षकांच्या समस्या मुक्तीची आस आणि त्यांच्या कल्याणाचा ध्यास त्यांनी हदयात कोरून ठेवला आहे.शिक्षकांच्या हक्कासाठी आणि हितासाठी त्यांनी अमरावती विभागीय शिक्षक संघटना स्थापन केली.शिक्षण आणि शिक्षकांच्या अनेक प्रश्नांसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे.आजपर्यत शिक्षणाच्या भरवशावर बहुजन समाजाचा विकास ऊत्तम झाला.आणि पुढे सुद्धा होणार आहे.मराठी शाळांचे आज खाजगीकरण सुरू आहे.मोडकडीस आलेल्या मराठी शाळा,लयाला जात असलेली मराठी संस्कृती,हे पाहून त्यांचे ह्रदय अनेकदा भरूनआलेले मी पाहिले आहे.मराठी शाळांचे प्रश्न सुटावे,शिक्षण सर्वांना मिळावे यासाठी कित्येक वेळा त्यांना गहिवरून येते.एक वेळ आमच्या कुटुंबावरचे प्रेम कमी होईल पण शिक्षक आणि शिक्षण यासाठी ते जबाबदारीने काम करतात.
मागील 40 वर्षापासून त्यांचा शिक्षणाचा हा ज्ञानयज्ञ अखंड सुरूचआहे.शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी केलेली प्रार्थना आज सफल झालेली आहे.कित्येक दिवसांचे स्वप्न पाहिले होते की,मला शिक्षकांचे प्रतिनिधी व शिक्षकांचे आमदार व्हायचे आहे.त्यासाठीचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे.शिक्षणक्षेत्राला उभारी देण्यासाठी त्यांनी निवडणुकीची जोखीम स्वीकारत पार सुद्धा पाडली आहे.ज्यांच्या हृदयात बहुजन समाजाप्रती संवेदना व समर्पित भावना आहेत,त्यालाच समस्या कळतात.आणि ज्याचा अभ्यास दांडगा आहे त्यालाच प्रश्न पडतात,समस्या सोडविण्यासाठी हृदयात करुणा व त्या सोडवण्यासाठी माणूस लवचीक असावा लागतो. शिक्षणाची ही संवेदना जाणून व शिक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
विनाअनुदानित शाळेवर निवृत्त झालेले शिक्षक,सरप्लस होऊन आयुष्याचा खेळखंडोबा झालेल्या शिक्षकांच्या समस्या मुक्तीसाठी जीवनाचे लक्ष त्यांनी ठरवून त्या समस्या मुक्तीसाठी जीवनात उभा संघर्ष सुरू केला आहे.
ज्यांच्या हृदयात त्यागाची आस असते.तो कधीच स्वार्थी नसतो.घाम पेरून कष्टाचे मोती कमवीणारा खरा महानायक ठरतो.कारण मानवता सुंदर करण्यासाठी,आव्हानांचा मुकाबला छातीवर संकटे झेलुनच करावा लागतो.शिक्षण क्षेत्रासाठी हे यांनी आज ते आरंभले आहे.मराठी शाळांचा प्रश्न, सरप्लस शिक्षकांचे प्रश्न,त्यांचे समायोजन,बंद पडणाऱ्या मराठी शाळा,शिक्षणाचे खाजगीकरण आणि 2005 नंतरची निवृत्ती वेतन योजना वाचवण्यासाठी निश्चय केला आहे. त्यासाठीचा प्रखर लढा असून मुंबईच्या प्रत्येक वारीत त्यांनी हा प्रश्न शासन दरबारी लावून धरला आहे.शिक्षण क्षेत्रातले सार्वजनिक हिताचे किंवा वैयक्तिक स्वरूपाचे सर्वच प्रश्न त्यांनी शासन दरबारी मांडले आहेत.
त्यातील 20% अनुदानाचा प्रश्न सुटला आहे.शिक्षक हा घटक मध्यवर्ती ठेवून यांनी जीवनाचे लक्ष्य निर्धारित केले आहेच.त्यासाठीचा त्यांचा निर्धार व विश्वास अविचल असा आहे.एक लक्ष्य निश्चित केले की,ते पूर्ण करण्यासाठी ते जीवाचे रान करतात.त्यासाठीची तळमळ, वेदना व भावना मानवतावादी आहे.त्यासाठी कुटुंब,जात,धर्म बाजूला ठेवून फक्त समस्या मुक्तीचे लक्ष ते जाणतात.यामुळे त्यांना,
*निश्चयाचा महामेरू।। बहुतजणांशी आधारू।।* हे शिवरायांचे लढण्याचे तेज व तंत्र लागू पडते.हे आमदार झाल्यापासून वर्षातले काहीच दिवस ते घरी असतात.बाकी सारा वेळ फक्त शिक्षण क्षेत्राला समर्पित होऊन ते पूर्ण करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले आहे.त्यांच्यामुळे मला सुद्धा शिवाजी शिक्षण संस्थेत शाळा समितीची अध्यक्षा म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.संस्थेत काम करताना यांची कमतरता जाणवते.पण शिवाजी कॉलेजचे प्राचार्य,श्रीअरुणराव सरनाईक आणि डॉ,स्नेहदीप भैय्या व शिवाजी परिवारातील सर्व शिक्षक यांच्या मदतीने मी हे काम पार पाडत आहे.
शिवाजी परिवारातील सर्वच शिक्षक उत्तम,प्रामाणिक आणि अगदी शिवरांयाच्या मावळ्यांसारखे निष्ठावंत असून आमच्या हृदय स्थानी असून, त्यांचा मला सार्थ अभिमान आहे.विद्यार्थी,शिक्षक,पालक यांच्याशी मी संवाद साधते,तेव्हा कळते की,त्यांनी केलेले काम किती उत्तम आहे.शाळा समितीची अधक्ष्या म्हणून मी आज कामाला सुरुवात केली आहेच.त्यात यांचे निर्णय,त्यांचा उपदेश,त्यांचा सल्ला,मी नेहमीच ऐकते.शिक्षण क्षेत्रातले अनेक प्रश्न आजही आहेत.त्यांच्या कामाची पूर्तता करण्यासाठीच मला ईश्वराने ही संधी बहाल केली आहे.यांचे कुटुंबावरचे अप्रतिम प्रेम,त्यांची भावनाशीलता नम्रता,विनयशीलता ,संयम,सेवाभाव,त्याग समर्पण हे पाहून माझे मन त्यांच्या विषयी आदराने भरून येते. अशा पवित्र व्यक्तीसोबत आपल्याला जीवन व्यतीत करण्याचे भाग्य व संधी ईश्वराने दिल्याने मनात कृतज्ञता तयार होते.असे महान व्यक्ती शिवाजी परिवारांचा कुटुंब प्रमुख आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे.संस्थेत काम करताना त्यांनी केलेला उपदेश निश्चितच मोलाचा असून मिळालेल्या संधीचा चांगला लाभ मला मिळत आहे.आपले जीवन या क्षेत्रासाठी समर्पित करायचे ही जाणीव ठेवून माझे कार्य सुरूच राहणार आहे.हे आमदार झाल्यापासून मला हा कामाचा महिमा अधिकच कळला आहे. दि.14 सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस आहे.त्यांच्या या कार्याला माझा सलाम.त्यांना कोटीकोटी शुभेच्छा.ईश्वर अधिकाधिक कार्य त्यांच्याकडून करवून घेवो. त्यांचे हातून शिक्षण क्षेत्राचे अधिकाधिक प्रश्न सुटावेत.आणि या क्षेत्रातला अंध:कार नष्ट व्हावा.यासाठी ईश्वराकडे या संकल्प पूर्तीची प्रार्थना करते.या मातीतला एक रणशूर आणि रणवीर इथेच आहे.त्यासाठी प्रार्थना करते,शेवटी त्यांच्यासाठी एवढेच म्हणते की,
ना तलवार ना भाला ना शस्त्र पाहिजे ।
मराठीमध्ये मातीमधले फक्त सत्व पाहिजे।
भूमीमध्ये दाटला या काळोख हा सारा,
मराठी संस्कृतीचाआम्हा अभिमान सारा। ना पैसा,ना अडका,ना धर्म पाहिजे ।।
मराठी माती मधला शूरवीर पाहिजे।।
हीच भावना व्यक्त करते.धन्यवाद.
सौ.अनिताताई किरणराव सरनाईक. अध्यक्षा : श्री शिवाजी शाळा समिती वाशिम.
आपल्या प्रतिक्रिया द्या....