दोन वर्षानंतर यावर्षी कोरोनामुक्त वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ ब्रम्हपुरी येथे प्रहारच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर प्रहार कार्यकर्त्यांनी नतमस्तक होत बाबासाहेबांना अभिवादन केले.
कार्यक्रमाप्रसंगी दिग्विजय सिंह उरकुडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समता प्रस्थापित करण्यास व विषमता नष्ट करण्यासाठी घालविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय जनतेवर फार मोठे ऋण आहे. आपण परतफेड करू शकत नाही.तरी त्यांच्या वैचारिक शांतीचामानवतेच्या शिकवणुकीचा व त्यांचे जीवन घडविणारे विचारांचा काही अंशी अंगिकार करू शकलो तर हीच महामानवास खरी आदरांजली ठरेल.तर अँड हेमंत उरकुडे म्हणाले कि, बाबासाहेबांनी संविधान भारत मातेच्या चरणी अर्पण करून या देशाला समर्पित केले.संविधान निर्मिती मागे त्यांचे स्वप्न होते की समाजातील तळागाळातील व्यक्तींच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला प्रयत्नांची शर्थ करायची आहे.
कार्यक्रमाप्रसंगी अँड. मंगेश मीसार, डॉ. हरिश्चंद्र ठेंगरे, प्रशांत दाणी, लंकेश ठेंगरे, प्रशांत दाणी, श्रीमती कमलाबाई उरकूडे, मोनाली ठेंगरे, अँड. कावेरी उरकुडे, कु. विधी ग्रेस, उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे संचालन लतेश रामटेके यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.