उपजिल्हा रुग्णालय कारंजा लाड येथे बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमे अंतर्गत वैशाली आशिष घनगाव रा.लोहारा यांना दिनांक ०८/०२/२०२५ ला सकाळी ०१.५३ वाजता सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली असून मुलगी झाल्याबद्दल मातेचे नवनिर्माण फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री अनुप ठाकरे आणि कोषाध्यक्ष श्री नितीन तायडे यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले, यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नथुराम साळुंखे, परिसेविका सौ. अर्चना ठाकरे, परिसेविका सौ संघा राऊत, अधिपरिचारीका सौ.माधुरी राठोड व इतर कर्मचारी उपस्थित होते.