सिरोंचा तालुक्यापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगया पल्ली गावात एका २० वर्षेय युवतीची तिच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सदर घटना 14 जुलै रोजी सकाळच्या सुमारास उजेडात आली मिळालेल्या माहितीनुसार ओलिता रमय्या सयाम वय २० वर्ष राहणार रंगायापल्ली तालुका शिरोंचा जिल्हा गडचिरोली असे निर्गुण हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. रात्रीच्या वेळामध्ये युवती आपल्या घरी झोपली असताना झोपेमध्ये तिची हत्या करण्यात आल्याने शिरोंचा तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सकाळच्या वेळामध्ये मृतक युवतीच्या भावाने झोपून उठल्यानंतर आपले अंथरूण व पाघरूंनचे कपडे खोलीमध्ये नेऊन ठेवण्यासाठी गेला असता युवती रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृ त्त अवस्थेमध्ये त्याला दिसली मृतक युवतीच्या मानेवरती शस्त्राचे वार पडले दिसले आणि घराच्या मागील दरवाजाचे दार हे उघडे दिसले. हत्या करून आरोपी घराच्या मागील उघड्या दरवाज्यातून पसार झाला असावा . घडलेल्या घटनेची माहिती सिरोंचा पोलिसांना देण्यात आली . लागलीच पोलीस घटनास्थळावर दाखल होवून युवतीचे प्रेत आपल्या ताब्यात घेऊन मृतक युवतीचे प्रेत शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय शिरोंचा येथे पाठवण्यात आले . युवतेची धारदार शस्त्राने हत्या झाल्याने ही हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही आरोपी विरुद्ध पोलिसांनी हतेचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल धवीले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.