कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे.) जुन्या प्राचिन ऐतिहासिक,सांस्कृतिक कारंजा शहरातील सर्वच राजकिय पक्षातील कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते यांच्या संवेदना पार हरविल्या असून,कारंजेकरांच्या विकासाकरीता कुणीच पुढे येतांना दिसत नसल्याचे भिषण वास्तव असल्यामुळे,सर्वसामान्य नागरीक बेजार झाला असल्याचे चित्र आहेत.एखाद्या पावसाने गाजरगवत वाढावे त्याप्रमाणे केवळ निवडणूकीच्या काळातच यांची निवडणूक वचननाम्यात मिथ्या आश्वासनांची जाहिरनामे प्रसिद्ध होत असवात.एरवी मात्र कारंजाच्या विकासाशी यांना काहीही देणेघेणे नसल्याची वस्तुस्थिती आहे.एरवी मात्र केवळ वर्षानुवर्ष यांचे वाढदिवस आणि सत्कार समारंभच सुरु असतात.सत्ताधारी राजकिय पक्षाला सळो की पळो करून सोडणारे ना इथे विरोधक आहेत. ना कारंजाचा विकास करण्याची उम्मेद बाळगणारे विश्वासू कार्यकर्ते आहेत.आणि त्यामुळेच वर्षानुवर्षे या विधानसभा मतदार संघावर बाहेरचेच नेते येऊन राज करीत आहेत.आमदार म्हणून बाहेरचे पाहुणेच,मतदार संघाच्या निर्मिती पासून वेळोवेळी निवडून येत आहेत.व कारंजेकरांच्या टाळूवरचे लोणी खात,आमदार कारंजाचे विकास मात्र स्वतःच्या जन्मभूमीचा करून स्वतःचे राजकारण बिनदिक्कतपणे सार्थ करून घेत आहेत.कारंजा शहरात ना पदवीधर किंवा डिप्लोमा शिक्षणाची कोणती व्यवस्था ? ना सामाजिक न्याय भवन ? ना औद्योगीक वसाहत ? ना मोठे उद्योगधंदे ? ना येथे चांगले रस्ते ? ना कोणत्या आरोग्य व्यवस्थेच्या सोयी सुविधा ? प्रगती ऐवजी या ऐतिहासिक आणि एकेकाळीच्या धनाढ्य शहराची वाटचाल अधोगतीकडे सुरु आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही एवढे मात्र निश्चित.