खमारीच्या श्यामबाबा राईस मिल येथे विद्युत स्पर्शाने लागल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना 9 जुलै रोजी सायंकाळी घडली. संदीप हेमंत बोहरे (२८, रा. खमारी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो त्या मिलमध्ये काम करीत असताना त्याला विद्युत स्पर्श झाल्याने वेळीच उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. परंतु त्याला पाहताच डॉ. पवन यादव यांनी मृत घोषित केले. या घटनेसंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.