मगरूळपीर शहरातील तडीपार इसमावर स्थानिक गुन्हे शाखेची शस्त्र अधिनियमांन्वये कारवाई.
समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. काही असामाजिक घटक समाजाची शांतता भंग करण्यासाठी व जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी शस्त्रांचा वापर करतात. त्याच्याविरोधात शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई करण्यात येते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विनापरवाना घातक धारदार शस्त्र बाळगत समाजामध्ये धाक, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मंगरुळपीर शहरातील एका आरोपीविरुद्ध कलम ४, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ सह विविध सहकलमांअन्वये कारवाई करण्यात आली आहे.