माजी सैनिक अनिलराव ना. उजवणे यांचे सुपुत्र अकोला जिल्ह्याची शान अकोला शहराच विचार केला तर या शहरात आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, मध्ये अधिकारी च्या संख्या फार कमी प्रमाणत आहे पण उजवणे परिवाराने विपरीत परिस्तिथी मध्ये दोन्ही मुलांना चांगली तालीम देऊन अधिकारी केल अश्यातचं राष्टपती च्या हातून अधिकारी पदावर कार्यरतं मेजर पंकज अनिलराव उजवणे अकोला शहरासाठी गौरवची गोष्ट हे जम्मू-काश्मीर येथे मेजर पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या विभागातील जवानांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून सदैव प्रेरित केले तसेच स्थानिक जनतेशी स्नेहपूर्ण संवाद साधत समाजाशी घट्ट नाते जोडले. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनसंपर्क यातून त्यांनी आपले पद सन्मानाने निभावले आणि देशासाठी प्रशंसनीय कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांचा संपूर्ण टीमसह व पत्नी सौ. कृतिका यांच्यासमवेत राष्ट्रपती भवन, दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार केला. या सत्कारानंतर राष्ट्रपतींसोबत स्नेहभोजनाचा मान मिळणे हा केवळ पंकजचाच नव्हे तर संपूर्ण अकोला शहरासाठी आनंदाचा क्षण आहे. मेजर पंकज आपण संपूर्ण अकोला शहराचे भूषण आहे. त्याचा अमर जवान माजी सैनिक संघटनेने सत्कार सुद्धा केला होता त्याचे वडील अमर जवान माजी सैनिक संघटनेचे सक्रिय सभासद आहेत यापुढेही देशसेवेतून यशस्वी कार्य होत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. मेजर पंकज अनिलराव उजवणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी कोट्यवधी शुभेच्छा. “कौतुक करावं तेवढं कमीच!”माजी सैनिक सुभाषराव म्हैसने व अमर जवान माजी सैनिक संघटना अकोला व डाबकी रोड अकोला