पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलतारा योजना प्रभावी असल्याचे प्रतीपादन कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी ग्राम काजळेश्वर येथे ग्रामपंचायत भवन येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतांना दि१७ मार्च रोजी केले . या वेळी त्यांनी जलतारा उपक्रमाचे महत्व व ऍग्रीस्टॅक योजनेच्या फार्मर आयडीची नोंदणी करण्याबाबत ग्रामस्थांना आवाहन केले .
वृत्त असेही जील्हाधीकारी भुवनेश्वरी एस. यांचे मार्गदर्शनात शेतकऱ्यांचे हित जोपासनारे कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी सोमवारी सकाळी काजळेश्वर येथे जी .प .प्राथमीक मराठी शाळा ;अंगणवाडी यांना भेट दिली व शैक्षणीक गुणवत्तेबाबत चाचपणी केली व शालेय पोषण आहारा बाबत माहीती घेतली . त्यांनी या भेटीत शेतकरी अशोक श्रीराम उपाध्ये यांचे शेतात जलतारा योजनेसाठी प्रत्यक्ष शोष खड्याचे भुमीपूजन करून शेतकऱ्यांशी जनसंवाद ग्रामपंचायत भवन येथे जलतारा योजने संदर्भात साधला . यावेळी बोलतांना तहसीलदार झाल्टे साहेब म्हणाले की जलतारा योजनेमुळे भुजल पातळी वाढून पाण्याची टिकाऊ उपलब्धता राहते पावसाचे पाणी साठवता येईल; पाण्याचा निचरा होईल शेती पाझरणार नाही आणि पाणी टंचाईच्या समस्येवर कायम स्वरूपी उपाय होईल एक एकरात एक जलतारा मिळेल त्यामुळे या योजनेचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले .यावेळी गावचे सरपंच नितीन पाटील उपाध्ये यांनी त्यांचा शालश्रीफळ देऊन सन्मान केला . या प्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार कुणाल झाल्टे; मंडळ अधीकारी निलेश गुगळे; सरपंच नितीन पा उपाध्ये; उपसरपंच तैसीम भाई; ग्रामपंचायत अधीकारी सतीष वरघट; तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्ये;कृषी मंडळ अधिकारी ढोकणे; कृषी सहाय्यक अनील राठोड इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती . प्रास्ताविक सरपंच नितीन पाटील उपाध्ये यांनी केले कार्यक्रमाचे संचलन तलाठी अजिंक्य खडतडकर यांनी तर आभार प्रदर्शन ग्राम पंचायत अधीकारी सतीष वरघट यांनी केले कार्यक्रमाला गावातील मान्यवर तर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते .