कारंजा (लाड) : कारंजा विधानसभा मतदार संघातून विधानपरिषदेसाठी एक वेळ आणि तब्बल तिन वेळा विधानसभेचे सदस्य राहिलेले वडील दिवंगत आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांचे निधन झाल्यानंतर,तिसऱ्या दिवशीच कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघात झालेल्या अवकाळीच्या चक्रीवादळ व गारपिटग्रस्त शेतकरी राजाला धिर देण्यासाठी त्यांचे सुपूत्र अँड ज्ञायक राजेंद्र पाटणी हे तरुण युवा नेते स्वतःच्या वडीलांचे मृत्युचे प्रचंड दुःख बाजूला सारून घराबाहेर पडले.आणि थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहचून त्यांनी शेतकरी राजाचे अश्रू पुसत त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची गळ तहसिलदार कारंजा / मानोरा आणि जिल्हाधिकारी वाशिम यांना घातली.त्याखेरीज वडिलांनी शासनाकडून मंजूर करून आणलेली मतदार संघातील कामे पूर्ण करून घेण्यासाठी (स्वतःचे नुकतेच लग्न झालेले असतांनाही स्वतःच्या घरादारावर पूर्णतः तुळशीपत्र ठेवून त्यांनी मतदार संघावर लक्ष्य केन्द्रित करून प्रत्येक खेडेपाडे गाववस्त्यावरील शेतकर्याचे पांदन रस्ते पूर्ण करून दिले.मतदार संघातील सर्व विकासकामे पूर्ण करून घेण्याकरीता रात्रीचा दिवस करून वारंवार मंत्रालयाच्या येरझारा करून मंत्रीमहोदय आणि अधिकारी वर्गाशी वेळोवेळी चर्चा करून सर्व मंजूर कामे निवडणूकापूर्वी पूर्ण करून घेतली.यातून त्यांची काम करण्याची हातोटी, कर्तव्यतत्परता,हजरजवाबीपणा जनतेला दिसून आला.जो तरुण आज कोणतेही पद जवळ नसतांना,मतदार संघासाठी त्याच्या तरुण वयात,जीव ओतून काम करतो.तो तरुण कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचा जर आमदार झाला तर भविष्यात कारंजा मानोरा मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलवून,भविष्यात येथे बारामती प्रमाणे विकास करून कारंजा मानोरा येथे नंदनवन करू शकतो.मतदार संघात नवनविन उच्च शिक्षणाची दालनं, मोठमोठी उद्योगधंदे आणून हजारो सुशिक्षित बेरोजगाराच्या आणि कामगार,मजूरांच्या हाताला काम मिळवून देवू शकतो.असा विश्वास महाविकास आघाडीचे शिर्षस्थ नेते शरदचंद्रजी पवार आणि सुप्रियाताई सुळे यांना वाटला. व खात्री पटली.त्यातूनच मग "मुर्ती लहान पण किर्ती महान" असणाऱ्या अँड. ज्ञायक राजेंद्र पाटणी ह्या कोहिनूर हिर्याची सुप्रियाताई सुळेंनी पारख करून, त्यांना महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची त्यांना उमेद्वारी दिली एवढेच नव्हे तर सौ.सुप्रिया ताई सुळे यांनी त्यांच्यावरील प्रेमापोटी कारंजा येथे जाहीर सभा घेतली. विशेष म्हणजे या विराट सभेला झालेली गर्दी पहाता या गर्दीने यापूर्वीचे कारंजा येथील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत.आज हिंदु असो वा मुस्लिम ; जैन असो वा बुद्ध ; शेतकरी असो वा मजूर प्रत्येकाच्या मनात अँड.ज्ञायक राजेंद्र पाटणी यांच्या सारख्या, कार्यदक्ष असणाऱ्या आणि सर्वधर्मीयांच्या लाडक्या युवा नेत्याची आमदार म्हणून निवड व्हावी.ही भावना दिसून येत आहे.