अकोला:-
दर्द से हमदर्द तक ट्रस्ट या संस्थेने गेल्या ३ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात गरजूंना मोफत सल्ला देण्याचे कार्य चालवले आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे शहरांमध्ये या संस्थेचा कार्यक्षेत्र अधिक प्रभावी आहे.
आज, लीगल ऐड ऑन व्हील्स वकील आपल्या दारी या उपक्रमाचे उद्घाटन राज्याचे राज्यपाल श्री राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात विदर्भातील अकोला येथून झाली आहे, आणि येत्या १५ दिवसांमध्ये ही गाडी संपूर्ण विदर्भभर मोफत कायदेशीर सल्ला देत प्रवास करणार आहे. या कार्यात अड. विभव दिक्षित हे विदर्भ प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.
या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान श्री संताजी इंग्रजी प्राइमरी स्कूल, बाळापूर नाका, अकोला येथे लीगल ऐड ऑन व्हील्स हे वाहन उपस्थित केले गेले आणि यातील २०-३० लोकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे आयोजन विद्या भारतीचे महानगर अध्यक्ष आणि संताजी इंग्रजी प्राइमरी स्कूलचे अध्यक्ष श्री मंगेश जी वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले गेले. तसेच, या उपक्रमाचे प्रस्ताविक दर्द से हमदर्द ट्रस्टचे विदर्भ प्रमुख अॅड. विभव जी दिक्षित यांनी केले. ट्रस्टच्या कार्याची माहिती अॅड. विघ्नेश्वर सुब्रमणियन यांनी दिली, तर अॅड. संकेत राव यांनी 'लीगल ऐड ऑन व्हील्स' या उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी अनेक घरगुती महिलांनी कौटुंबिक व संपत्तीशी संबंधित वाद, तसेच काही लोकांनी फौजदारी कायदेशीर मदतीसाठी संपर्क केला. सर्वांच्या शंकेचे निरसन करण्यात आले आणि त्यांना उत्तरांबद्दल समाधानकारक प्रतिसाद मिळाला.
तसेच, DLSA अकोला चे PLVs देखील या कार्यक्रमात उपस्थित होते आणि त्यांनी सहभाग घेतला. बाळुभाऊ लटकुटे, दादाराव खडसने, आणि विठ्ठल नांदूरकर यांनीही सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आभार जय राणे आणि महेश कितुकले यांनी मानले.
ही गाडी संपूर्ण विदर्भातील गरजूंना कायदेशीर सल्ला उपलब्ध करून देईल, आणि या उपक्रमामुळे लोकांना न्याय मिळविण्याची सोपी व प्रभावी मार्गदर्शनाची संधी मिळेल.
आपल्या प्रतिक्रिया द्या....