कारंजा:- 1 फेब्रुवारी 2024 रोजी इंझा येथील उच्च प्राथमिक शाळेत "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा लेखी संदेश असलेले छापील पत्र विद्यार्थिनींना, विद्यार्थ्यांना जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञायकभाऊ पाटणी यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले . गटशिक्षण अधिकारी माने यांच्या मार्गदर्शनात शाळेतील कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे येथील शिक्षक अजय चव्हाण यांनी सांगितले. शाळेचे कर्मचारी शिक्षक श्री विजय ढोके अजय चव्हाण, माधुरी सवने ,कविता राठोड इत्यादी उपस्थित होते.
शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात सर्वश्री भाजपा तालुका अध्यक्ष डॉक्टर राजीव काळे, जि.प सदस्या सौ. सुनीताताई दिलिपराव नाखले , भाजपा उपाध्यक्ष संकेत नाखले, पंचायत समिती सदस्य शुभम बोनके , समिती सदस्य दिनेश वाडेकर, येथील सरपंचसौ .राधिका संकेत नाखले , कमलाकर मोरे येथील सरपंच परमेश्वर आमले येथील सरपंच मुगल वडगाव रंगे येथील सरपंच अखिलेश रंगे हि येथील उपसरपंच, बन्सी भाऊ चौधरी संतोष भगत तंटामुक्तीचे अर्जुन सोळंके भगत, मनभा येथील सरपंच शितल बापू देशमुख इत्यादी उपस्थित होते. असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांचे स्वीय सहाय्यक यांनी कळविले.