चिमुर तालुक्यातील बोथली (लावारी) येथे ब्रम्हपुरी येथील गांधीनगरातील मेश्राम कुटुंब लग्न कार्यासाठी रवीवारला बोथली येथे आले होते.
लग्न कार्य व नेतारनी आटोपुन २ मे ला सायंकाळी ४. ३० वाजता ब्रम्हपुरी येथे परत जात असतानी सारगंड ते सोनापुर या रस्त्याच्या मध्ये अमेज कंपनीची गाडी क्रंमाक एम. एच. ३३ ए. सी. -४५२८ हीचा समोरचा चाक पंचर झाल्याने व चालकाचे गाडीवरील नीयत्रण सुटल्यानेरस्त्याच्या खाली गाडी पलटी झाली.
ही घटना प्रवाशाना लक्षात येताच या गाडीमध्ये दबुन असलेल्या कुटुबांला गाडीचा काच फोडुन सगळ्या कुटुबांना काढले. यात तीन वर्षाचा लहानचा बालक होता. याला कोणतीही इजा पोहचली नाही. यात चालक व दोन महीला जखमी झाल्या आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले आहे.
सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी सुटकेचा नीस्वास सोडला.