कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)
; केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा स्वछता व कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने वाशिम येथे ग्राम स्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
गुरुसेवा आश्रम कारंजा लाड येथे आयोजित केले आहे. या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली होती. यावेळी या प्रशिक्षणाला कारंजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.पि.पडघान , वाशिम जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे शंकर आंबेकर, राम शिंगारे, कृषी विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापन अंबादास खडसान, प्रकल्प जिल्हा समन्वय प्रविण पट्टेबहादुर, यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
या प्रशिक्षण कार्यशाळेत जल जीवन मिशनची माहिती, योजने अंतर्गत घेता येणार विविध घटक, राबविण्यात येणारे उपक्रम, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी,जल स्रोतांची निर्मिती, दुरुस्ती, सक्षमीकरण,पुनर्भरण, ग्रामस्थांचे नियोजन, अंमलबजावणी, देखभाल दुरुस्ती या विविध टप्यातील सहभागाचे महत्त्व,योजनेची गुणवत्तापूर्ण निर्मिती, ग्राम पातळीवर ग्रामस्थ, कुशल कामगार, कर्मचारी यांची क्षमता विकसित करणे, पाणी गुणवत्ता तपासणी,गाव कृती आराखडा, शासनाच्या विविध योजनांचे एकत्रीकरण करणे, यासह विविध विषयावर खेळ, गाणी, विविध कृती या विषयीचे माहिती देण्यात आली. प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले यावेळी उपस्थित कारंजा लाड गट विकास अधिकारी एस.पि. पडघाण , पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद वाशिम चे शंकर आंबेकर, यांनी सदर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. जि.प.पा.पु.व स्व.वि. राम शिंगारे,कृषी विकास प्रशिक्षण संस्थचे तथा प्रकल्प व्यवस्थापक अंबादास खडसान, प्रकल्प जिल्हा समन्वयक प्रविण पट्टेबहादुर, कृषी विकास संस्थेचे सुदर्शन पवार यांच्या मार्गदर्शनास पद दिले जात असून प्रशिक्षणास विविध गावातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पाणीपुरवठा व स्वछता समिती सदस्य,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गटातील सदस्य यांना आमंत्रित करण्यात केले जात असून, प्रशिक्षणात जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती वसूमना पंत व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे अमित नाफडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन हे सदर प्रशिक्षणातून केले जात आहे.सदर जलजिवन मिशन क्षमता बांधनी प्रशिक्षणाचे प्रशिक्षक प्रविण पट्टेबहादुर, देवानंद घोडमोडे, किशोर पंडित, चंद्रकांत शिंदे,विनोद कुठे, रेश्मा माहुलकर,अक्षय राऊत, प्रदिप पट्टेबहादुर,राजाभाऊ पडघाण, मिरा गांजरे असून सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवांदन घोडमोडे यांनी केले. तर आभार प्रदीप पट्टेबहादुर यांनी मानले.
उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी यांना कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने प्रशस्तीपत्र देण्यात आले. यावेळी या प्रशिक्षण बाबत अभिप्राय देतांना उपस्थित एक पुरुष, महिला प्रतिनिधी यांनी या पार पडलेल्या प्रशिक्षण बाबत समाधान व्यक्त केले. व संस्थेने पुरविलेल्या सोयी सुविधा ह्या अत्यंत व्यवस्थित असल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी कारंजा लाड तालुक्यातील जल जीवन मिशन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या ९२ गावाला प्रशिक्षण देण्यात आले
आपल्या प्रतिक्रिया द्या....