अकोला:-
अकोला जिल्हा अखंड गरजवंत मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारला एकदिवसीय आत्मक्लेष धरणा सत्याग्रह आंदोलन दहा ते पाच या वेळात करण्यात आले . तसेच जिल्हाधिकारी अकोला यांच्यामार्फत प्रांतप्रधान व मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली .या मध्ये मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून ही केस जलद गती न्यायालयात चालवण्यात यावी तसेच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करून त्यांच्यावर 302 चां गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना अटक करण्यात यावी.तसेच छत्रपती शिवाजी महाराज ,संभाजी महाराज , जिजाऊमाता ,शहाजी महाराज या व इतर महापुरुषांची बदलामी केल्याबद्दल तसेच धार्मिक भावना दुखावल्याबद्दल जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याबद्दल नागपूर येथील प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी. त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी.तसेच महापुरुषांच्या बदलामी करणाऱ्या चित्रपट, नाटक ,लेख, कविता, तसेच भाषणे याच्यावर बंदी घालण्यात यावी जो कोणी हे कृत्य करीत आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मराठा समाजाला त्वरित आरक्षण देण्यात यावे, भाजप सरकारने निवडणुकीत सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा व कर्जमुक्ती देण्यात यावी. स्वर्गीय संतोष देशमुख कुटुंबीय यांना व समाजसेविका अंजली दमानिया यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी अखंड गरजवंत मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे दिनांक 11 मार्च 2025 मंगळवारला सकाळी १० वाजता पासून आत्मक्लेष धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात शासनाच्या वेळ काळू धोरणाचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हा, तालुका व गाव पातळीवरील मराठा सेवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तसेच अकोला जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विविध संघटनांनी सक्रिय सहभाग घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते .

तसेच जिल्ह्यातील अनेक मराठा संघटना व परिवर्तनवादी बहुजन संघटनांनी या सत्याग्रहाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवून सरकारचा निषेध केला .या आत्मक्लेष धरणे सत्याग्रह आंदोलनात मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते देवराव पाटील हागे ,अखंड गरजवंत मराठा समाजाचे संयोजक राजेश देशमुख, समाजसेवक मराठायोद्धा गजानन हरणे, पाटील समाजाचे ज्येष्ठ नेते प्रदीप खाडे,अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय संघटक दादाराव पाथरीकर, मराठा सेवा संघाचे अशोक पटोकार, मराठा महासंघाचे राम मुळे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रदीप चोरे, पाटील समाज मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील, शरद वानखडे,मराठा योद्धा नंदकिशोर गावंडे, प्रकाश डिवरे, प्रमोद धर्माळे, प्रेम पाटील, सुनील वनारे, श्रीकृष्ण माळी, अक्षय राऊत, सदानंद खारोडे, विजय देशमुख, सुरेश ठाकरे, बबनराव कानकिरण, दखनी मराठा समाजाचे नेते नरेश सूर्यवंशी, विठ्ठल गाडे, बाळू पाटील ढोले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष देवानंद साबळे, योगेश ढोरे, रवींद्र पाटील, अक्षय भांगे, घाटोळ पाटील समाजाचे नेते मनीष खांबालकर, श्रीकृष्ण जानोरकर तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मंगेश काळे, गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा, संजय भांबेरे, मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे,आदी मान्यवरांनी या आत्मक्वेष धरणे सत्याग्रहामध्ये दिवसभर सहभाग दिला व उपस्थित राहून मार्गदर्शन केले. जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी ईदूमती देशमुख, रेणू गावंडे, सीमा तायडे, सविता शेळके, सविता कुटे, जिजाबाई थोरात, आदी महिला पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.व . या आत्मक्लेष धरणे सत्याग्रहामध्ये जिल्ह्यातील अखंड सकल गरजवंत मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात अकोला जिल्ह्यातील जागरूक मराठा पाटील देशमुख कुणबी समाजाच्या व परिवर्तनवादी बहुजन विचाराच्या नागरिकांनी महिलांनी युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन हा सत्याग्रह कार्यक्रम यशस्वी केला. या सर्वांचे आभार अखंड गरजवंत मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले .
आपल्या प्रतिक्रिया द्या....