कारंजा (लाड) : कारंजा येथील स्थानिकच्या महिला उमेद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, महायुती मधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाच्या अधिकृत उमेद्वार श्रीमती सईताई प्रकाश डहाके यांच्या कारंजा मानोरा मतदार संघातील प्रचाराची जबाबदारी त्यांच्या सुनबाई सौ. तेजस्विनीताई यांनी आपल्या खांद्यावर घेतली असून,आपल्या सासुबाई यांच्या प्रचाराकरीता त्या घरोघरी गृहभेटी घेऊन, मतदारांशी संवाद साधत आहेत. उल्लेखनिय म्हणजे महायुतीच्या उमेद्वार श्रीमती सईताई डहाके ह्या आशिया खंडातील प्रथम क्रमांकावर स्थापन झालेल्या पहिल्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या बाजारपेठेच्या पहिल्या महिला सभापती आहेत. शिवाय कारंजा येथील पंचायत समिती,अनेक ग्रामपंचायती आणि सेवा सहकारी संस्थामध्ये त्यांच्या गटाचे प्राबल्य आहे. श्रीमती सईताई डहाके ह्या, कारंजा येथील विकासपुरुष म्हणून गौरवांकित असलेल्या दिवंगत आमदार तथा विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष स्व.प्रकाशदादा डहाके यांच्या अर्ध्यांगिनी असून त्यांना माननारे मतदार कारंजा मानोरा मतदार संघात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलल्या जात आहे.