ब्रम्हपुरी शहरातील हनुमान नगर येथील रहिवासी संगीता प्रमोद मेश्राम ह्या ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात स्वयंपाक बनवण्याचे काम करतात. त्यातून आलेल्या पैशातुन त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. त्यांची मुलगी सेजल हि शिक्षणात हुशार आहे. तिने अगदी चांगल्या गुणांनी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली. व आता ती अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे पदवीचे शिक्षण घेत आहे. मात्र घरची परिस्थिती गरिबीची असल्याने तिला शिक्षण घेतांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे तिच्या आईने या संदर्भात राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांची भेट घेत मुलीच्या शिक्षणाबाबत व निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींबाबत माहिती दिली.
त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सदर मुलीच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी आपल्या स्वतः कडून आर्थिक मदत दिली.
अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच आरोग्य व शिक्षण या सुध्दा माणसाच्या मुलभूत गरजा झाल्या आहेत. त्यामुळे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे नेहमीच वैद्यकीय उपचारासाठी नागरिकांना मदत करीत असतातच मात्र कुणीही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीच्या किंवा इतर कारणाने शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी देखील ते पुढाकार घेत असुन अनेक विद्यार्थ्यांनी त्यांनी मदतीचा हात दिला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी २०० विद्यार्थी क्षमतेची वातानुकूलित ईलायब्ररी त्यांच्या प्रयत्नातुन ब्रम्हपुरी येथे निर्माधीनवस्थेत आहे. सोबतच काही महीन्यांपुर्वी ब्रम्हपुरी मतदारसंघातील नीट व जेईई ची तयारी करीत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या वतीने मोफत पुस्तके वितरीत करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळावे यासाठी नामवंत मार्गदर्शक नितेश कराळे यांच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम देखील त्यांनी आयोजित केला होता. लोकप्रतीनीधी कसा असावा याचा प्रत्यय नागरिकांना यानिमित्ताने आला आहे.
सदरची आर्थिक मदत देतांना नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, जनसंपर्क अधिकारी सुधीर पंदीलवार, वकार खान, आवळगाव सेवा सहकारी संस्थेचे सदस्य किशोर राऊत, गौरव भेंडारकर, सोमेश्वर उपासे, अमोल सलामे यांची यावेळी उपस्थिती होती.