रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना निःशुल्कपणे रक्त मिळवून देण्यासाठी मदत करणे, रक्तदानाबाबत समाजात जनजागृती करणे अशी कामे ब्रम्हपुरी तालुक्यात रक्तवीर सेना नावाच्या रक्तदान चळवळीत सक्रिय असलेल्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येतात. या संघटनेला कार्यालय सुरू करायचे असल्याने त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी संगणक संचाची आवश्यकता असल्याने तशी मागणी त्यांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कडे केली.
तेव्हा सदर मागणीची दखल घेत रक्तदान चळवळीत कार्यरत असलेल्या या संघटनेतील पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन मिळून त्यांनी अजुन जोमाने काम करावं यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी आपल्या स्वतःकडून रक्तवीर सेना फाऊंडेशनला संगणकाचा संपूर्ण संच आपल्या स्वतः कडून भेट दिला आहे.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प. सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, किसान काॅंग्रेस सेलचे तालुकाध्यक्ष नानाजी तुपट यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थिती होती.