कारंजा : आठवडाभर पावसाने उघाड दिल्यानंतर,गेल्या चार पाच दिवसा पासून असह्य उकाडा जाणवीत होता.त्यामुळे शेतातील पिकावर ही परिणाम होत असल्याने,बळीराजाला पावसाची प्रतिक्षा होती.दि.19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन झाले असून,दि.21 सप्टेंबर रोजी गौराई आगमनाचा दिवस असतांना मात्र,दिड दोन वाजोच्या सुमारास,भर दुपारी, अचानकपणे पावसाने,गौराईच्या आवाहनाला हजेरी लावली. आणि तासभर धो धो कोसळधारा बरसल्या.
अचानक आलेल्या ह्या पावसाने बाजारपेठेत एकच धांदल उडाली. रस्त्यावर पाणीच पाणी साचून शहरातील महात्मा फुले चौक, बजरंगपेठ चौक, स्व इंदिरा गांधी चौक,नेहरु चौक,डॉ आंबेडकर चौकातील रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते.तसेच या पावसाने फुटपाथवर मुर्त्या विकणाऱ्या मुर्तिकारांचे नुकसान झाले असल्याचे वृत्त कुंभार समाजाचे मुर्तिकार मनोज बढोणे आणि कैलास हांडे यांनी कळवीले आहे. त्याशिवाय अनेक लघु व्यावसायिकांचे सुध्दा नुकसान झाले असून, खरेदीकरीता आलेल्या गिऱ्हाईकांची तारांबळ उडाली.शिवाय जास्त पावसामुळे अनेकांच्या झोपडीवजा घरातही पाणी शिरले असून अनेक भागातील विद्युत लाईन खंडीत झाली आहे.मात्र आजच्या पावसाने शेतातील पिकाला नवचैतन्य प्राप्त झाले असून, पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे.असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे कारंजा यांनी कळविले.