कारंजा :-
९ नोव्हेंबर रोजी महिला मेळाव्यास मार्गदर्शन करतांना भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार हे सर्वसामान्य जनतेचे सरकार असल्याने जनतेत जाऊन काम करीत आहे.मागील अडीच वर्षे ऑन लाईन सरकार होते.कारंजा येथील महेश भवन येथे आयोजित भव्य महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या पुढे बोलतांनी त्यांनी संघटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगून उपस्थीत महिलांना उद्देशून त्यांनी सांगितले की ,जेव्हा महिला अन्याय अत्याचाराची घटना घडते तेव्हा उशीर न करता वरिष्ठ पदाधिकारी यांची वाट न बघता घटना स्थळावर पोहचून अन्याय ग्रस्तास मदत करा . रीतसर कायदेशीर मदत करा.मी तुमच्या सोबतअसेल कोणासही घाबरण्याचे कारण नाही.
चित्रा वाघ विदर्भाच्या दौऱ्यावर असून आज, बुधवारी कारंजा येथील महेश भवन येथे आयोजित भव्य महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. राज्यातील 45 खासदार आणि 200 आमदार भाजपाचे लक्ष आहे .महिला मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरे करुन संघटनवाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत 48 लोकसभा मतदार संघापैकी 45 लोकसभा मतदार संघ व 288 विधानसभा मतदार संघापैकी 200 च्यावर मतदार संघात भाजप लढणार असून केवळ लढणारच नाही तर जिंकणार असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी यावेळी केला.मंत्रिमंडळात लवकरच महिलांना संधी मिळेल राज्यात भाजप सत्तेत आहे. सध्या महिला व बालकल्याण मंत्री पदावर मंगलप्रभात लोढा आहेत. त्यांना कळू द्या, महिलांच्या समस्या काय आहेत.तुम्ही चूप बसून चालणार नाही आपले सरकार, आपला पक्ष जनतेसाठी करीत असलेल्या कामाची माहिती जनतेला करून घ्या.आपल्या लोकांना समजावून सांगा .विरोधकांना सडेतोड उत्तर द्या.

मंत्रीमंडळात महिलांना स्थान मिळेल काय असा प्रश्न पत्रकार यांनी विचारला असता त्यांनी संधी मिळेल असा आशावाद व्यक्त केला.कारंजा महिला मोर्चा आयोजित मेळाव्यात भाजपा महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्त्या व सामान्य महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शुभदा नायक यांनी यावेळी या व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला .त्यावेळी त्यांचे स्वागत भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र् प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ व विधान परिषद सदस्य डॉ रामदासजी आंबटकर यांनी केले. त्यांना शुभेच्छा देत सांगितले की, भाजपा पक्षाचा जनसेवेचा वसा सामान्य लोकांपर्यंत पोहचवा .तसेच उपस्थीत महिलांना उद्देशून सांगितले की,आपल्या क्षेत्रातील ईतर पक्षांच्या महिलांना /पदाधिकारी यांना सुद्धा आपल्या पक्षात येत असल्यास घ्या.त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदाच होईल. कोणी आपल्या पक्षात आल्याने आपले स्थान डळमळीत होईल असे कोणी समजू नका अशा त्या व्यासपीठावरील उपस्थीत महिला पदाधिकारी यांना उद्देशुन म्हणाल्यात.येथे नवनिर्वाचित मानोरा पं स सभापती सुजाताताई जाधव यांचा सुध्दा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.कार्यक्रम प्रसंगी विधान परिषद आमदार रामदासजी आंबटकर, भटक्या विमुक्त आघाडी विदर्भ संयोजिका रश्मीताई जाधव यांनी आपले विचार मांडलेत .

व्यासपीठावर मार्गदर्शक म्हणून भाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ ,कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ मीनाताई काळे, विधान परिषद आमदार रामदासजी आंबटकर, भटक्या विमुक्त आघाडी विदर्भ संयोजिका सौ रश्मीताई जाधव, राजू पाटील राजे, पुरुषोत्तम चितलांगे,ललित चांडक राजीव काळे, नागेश घोपे, जि प सदस्या स्वातीताई पाटील, पं स सभापती सुजाता जाधव, रेखाताई राठोड,चंदाताई कोळकर, प्रितीताई धाकतोड, अर्चना वाघ ,जि प सदस्या वीणाताई जयस्वाल, मंडळ अध्यक्ष कारंजा महिला मोर्चा पायल तिवारी, मानोरा महिला मोर्चा अध्यक्ष अन्नपूर्णा पांडे ,ममता शर्मा ,जि प सदस्य उमेश ठाकरे, ठाकुरसिंग चव्हाण ,विजय काळे, शाम खोडे, रवींद्र ठाकरे, शंकर बोरकर, सुरेश मुंढे, रितेश मलिक, आदींसह अन्य भाजपा ,युवा मोर्चा, महिला मोर्चा इत्यादींचे शहर, तालुका मंडळ अध्यक्ष पदाधिकारी,भाजपा पक्षाचे स्थानिक संस्थांतील पदाधिकारी ,यांची उपस्थिती होती.
उपस्थीत जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व शहर मंडळ अध्यक्ष, तालुका मंडळ अध्यक्ष, सर्व महिला मोर्चा तालुका ,शहर मंडळ अध्यक्ष यांनी चित्राताई वाघ यांचे व्यासपीठावर जाऊन स्वागत केले तसेच पोहरादेवी सर्कल मधील व ईतर सर्कल मधील महिला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी महिला यांनी सुध्दा स्वागत केले.कार्यक्रमाचे व्यवस्थेसाठी महिला मोर्चा कारंजा शहर मंडळ अध्यक्षा पायल तिवारी, शहर मंडळ अध्यक्ष ललित चांडक, ग्रामीण मंडळ अध्यक्ष डॉ राजीव काळे,उपाध्यक्ष राजीव भेंडे, सरचिटणीस शशी वेळूकर ,ललित तिवारी,युवामोर्चा अध्यक्ष अमोल गढवाले,अभिनव तापडिया, मोहन पंजवानी, जगताप ,बंटी डेंडूळे यांच्यासह येथील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक मार्गदर्शन भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ मीनाताई काळे यांनी केले तर कार्यक्रम संचलन सौ. प्राजक्ता माहितकर यांनी केले. आभार मेघाताई बांडे यांनी मानलेत.असे वृत्त महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषद वाशिम यांना मिळाल्याचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....