वाशिम : वाशिम शहराच्या हृदयस्थानी असलेली,महात्मा फुले नगर परिषद मार्केट ही शहरातील सर्व नागरीकांच्या बाजार खरेदीची बाजारपेठ.येथे प्रत्येक वस्तुच्या खरेदी करीता नागरिकांची झुंबड उडतांना दिसत असते. या बाजारपेठेत सर्व प्रकारच्या दुकानांसोबतच शाकाहारी व मांसाहारी वस्तुची तसेच भाजीपाला व फळविक्रेत्यानी देखील आपआपली दुकाने थाटलेली आहेत. परंतु बाजार पेठेवर नगर पालीका अधिकारी यांचे नियंत्रण व देखरेख नसल्यामुळे, बाजारपेठेत साफसफाई व केरकचरा निर्मूलन होतांना अजीबात दिसत नाही. त्यामुळे जागोजागी दुर्गंधी व केरकचऱ्याचे ढिग झालेले दृश्य दिसून येत असून, त्यामुळे नागरिकांना दुषीत वस्तू घरी न्याव्या लागतात. व अशा विपरीत परिस्थितीचा सामना करतांना वाशिमकरांना त्रास होत असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची व एखादी रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नगर पालिका आतातरी लक्ष्य देणार का ? याकडे नागरिकाचे लक्ष्य लागले आहे.