ब्रम्हपुरी :-दि.26 जानेवारी 2023 ला भारतीय गणराज्य दिनानिमित्य ब्रम्हपुरी तालुका बुद्धिबळ संघटना ब्रम्हपुरी च्या वतीने "स्व. केवळरामजी राऊत स्मृती गणराज्य दिन बुद्धिबळ स्पर्धा -2023"चे भव्य आयोजन स्वागत मंगल कार्यालय ब्रम्हपुरी "येथे करण्यात आले. स्पर्धेत एकूण 127 खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेचे प्रयोजक श्री सचिन केवळराम राऊत माजी. नगरसेवक न. प. ब्रम्हपुरी तर्फे एकूण 11000/- रुपयाचे रोख बक्षीस वा प्रोत्साहन पुरस्कार होते. स्पर्धेचे उदघाटन 10.30 वाजता BTCA चे संस्थापक सचिव तथा मार्गदर्शक श्री हरिश्चंद्रजी चोले व पदाधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. ओपन व विद्यार्थी गटातील सहा फेऱ्या पूर्ण करून 5.00 वाजता स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. ओपन गटात -रितेश कामडी प्रथम, उमेश सहारे द्वितीय व रजत कामडी तृतीय तसेच विद्यार्थी गटात -सोहम चिलमवार प्रथम, अथर्व सोनवाने द्वितीय व सोहम आखाडे तृतीय अश्याप्रकारे विजयाचे मानकरी ठरले.
दोन्हीही गटात 10-10 रोख पुरस्कार व 5-5 प्रोत्साहन पुरस्कार देऊन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.समारंभाच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई केवळराम राऊत ब्रम्हपुरी, बक्षीस वितरक व प्रमुख मार्गदर्शक श्री भाऊराव राऊत मा. मुख्याध्यापक कृषक विद्यालय चौगान, प्रमुख अतिथी श्रीमती उज्ज्वलाताई प्रकाश नागमोती मा.शिक्षिका ने.ही. हायस्कूल ब्रम्हपुरी तसेच सौ. वैशाली रामटेके ब्रम्हपुरी यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून बक्षीस वितरण केलेत. मुख्य ऑरबिटर श्री. रितेश उरकुडे,श्री. निलेश बांडे, व श्री.विनय खोब्रागडे तसेच प्रा. वारे सर यांनी श्री चोले सर यांचे मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून स्पर्धा यशस्वी केली.प्रास्ताविक श्री दशरथ बांडे अध्यक्ष BTCA यांनी केले तर श्री संजयराव देव सर यांनी संचालन व सौ प्रा. मनीषा गेडाम यांनी आभार प्रदर्शन केले. श्री हरिश्चंद्रजी चोले संस्थापक सचिव, श्री तुळशीरामजी सपाटे सहसचिव, श्री सचिन राऊत,श्री महादेवजी दर्वे सचिव,श्री गोकुलदासजी खोब्रागडे उपाध्यक्ष ,श्री शंकररावजी नाकतोडे , श्री मुनीराज कुथे, प्रा. सतीश शिनखेडे, श्री झुबेर राय्यानी,श्री दामोधर बावनकुळे व BTCA चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे उपस्थितीत स्पर्धेची सांगता करण्यात आली.