अकोला:- शहराच्या अध्यात्म आणि धार्मिक क्षेत्रांमध्ये भर घालण्यासाठी स्वामीनारायण मंदिराचा भव्य मंदिर भक्तांच्या सेवेत दाखल होत आहे यानिमित्ताने त्या मंदिरापासून स्थापना निमित्त स्वामीनारायण भगवान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्य संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरापासून शोभायात्रा आरंभ झाली त्यानिमित्ताने शोभायात्राच्या शुभारंभ प्रसंगी व संतांचे आशीर्वाद घेताना भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर तसेच स्वामीनारायण भक्तांना शुभेच्छा देऊन अकोला या शहराच्या व जिल्ह्याच्या संस्कार सोबत अकोल्याच्या इतिहासामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भर घालण्यासाठी स्वामीनारायण यांचा विशाल मंदिर सामाजिक आर्थिक विकासाला गती देणारा असल्यामुळे स्वामीनारायण भक्तांचे स्वागत भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार सावरकर यांनी करून देश आणि विदेशात स्वामीनारायण भक्तांनी विशाल भारतीय संस्कृतीचा परिचय घडवल्याबद्दल संतांचे आशीर्वाद घेऊन आमदार रणधीर सावरकर यांनी नमन केले.