पालकमंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या पुढाकाराने व सेवाग्राम येथील सेवाग्राम मेडिकल कॉलेज यांच्या वतीने दिनांक आज दि. ९ एप्रिल रोजी गांगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात मोफत मोतीबिंदू डोळे तपासणी व कृत्रिम भिंगारोपण मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबीराप्रसंगी ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, ब्रम्हपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद चिमुरकर, पं.स. माजी सदस्य थानेश्वर कायरकर, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगलाताई लोनबले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी जि.प. सदस्या भावनाताई ईरपाते, गांगलवाडी येथील सरपंच विवेक बनकर, उपसरपंच धनंजय बावणे, बाजार समितीचे प्रशासक दिवाकर मातेरे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रुपेश बानबले, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, माजी सरपंच राजेश पारधी, शेतकरी सल्लागार समितीचे सदस्य किशोर राऊत, माजी उपसरपंच शिवाजी नखाते, गांगलवाडी ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष धीरज जिवतोडे, ग्रा.पं.सदस्य नितीन चौधरी, ग्रा.पं. सदस्या गायत्री मेश्राम, ग्रा.पं. सदस्या चंदा मशाखेत्री, हेमंत सेलोकर, गांगलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ किर्ती धनकर, डॉ. अभिजीत भुरले यांची यावेळी उपस्थिती होती.
सदर शिबीरात दोनशेहून अधिक नागरिकांनी नोंदणी करून नेत्र तपासणी केली. त्यापैकी ५८ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे नेण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार राहुल मैंद यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....