वाशिम : भारत निवडणूक आयोगाने अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. पंकज कुमार यांची नियुक्ती केली आहे. या निवडणूकीच्या संदर्भात नागरीकांची/ मतदारांची काही तक्रार असल्यास त्या नोंदविण्यासाठी निवडणूक निरीक्षक आणि त्यांचे संपर्क अधिकारी यांचे संपक क्रमांक जाहिर करण्यात आले आहे. निवडणूक निरीक्षक श्री. पंकज कुमार यांचा संपर्क क्रमांक 9518529991 असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी प्रादेशिक मत्स्यव्यवसाय अधिकारी विजय शिखरे हे असून त्यांचा संपर्क क्रमांक 8208413011 हा आहे. असे संजय कडोळे यांनी कळवीले.