अकोला:- नगरीमध्ये एक अभूतपूर्व वाढदिवस साजरा करण्याचा आयोजन करण्यात आलं होतं आजच्या दिवशी अकोल्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतःचा वाढदिवस हा गोरक्षण संस्थांमध्ये साजरा केला यावेळेस त्यांची गुळ तुला करण्यात आली तसेच गाईंसाठी लागणारा जो मेवा असतो त्यापासून एक केक बनवण्यात आला आणि तो सर्वांनी तिथे दिवे लाऊन सर्वांनी गाईंच्या सहवासामध्ये आणि आपल्या आप्त मित्रपरिवारांसोबत केक कटिंग करून सर्वांनी आपल्या आपल्या हातून त्या गाईंना हा केक खाऊ घातला आणि हा अत्यंत असा आनंदाचा आत्मिक समाधानाचा देणारा असा वाढदिवस साजरा करण्यात आला.
स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष रवींद्र फाटे यांना अशोक जी पंड्या यांनी ही कल्पना दिली होती आणि त्या कल्पनेचा रूपांतर रवींद्र फाटे यांनी 30 एप्रिल 2024 रोजी आपला स्वतःचा वाढदिवस या गोरक्षण संस्थांमध्ये साजरा केला होता आणि लोकांना आवाहन केलं होतं आणि त्या दिवसापासून तर आतापर्यंत गोरक्षण संस्थांनलां 8 लोकांनी वाढदिवस साजरा केलेला होता परंतु आज दिनांक 8 सप्टेंबरला 11 जणांचा एकत्रित वाढदिवस साजरा करण्यात आला. यामध्ये अरविंद देठे ,डॉ. विनायक देशमुख , श्री. अशोक पंड्या सर,सौ. आरती लढ्ढा , सौ. स्मिता जानोलकर, सौ. आशा वर्मा, श्री. अनिल बोरखडे, कु. तृप्ती सोनोने ह्यांनी वाढदिवस साजरा केला.
या कार्यक्रमाचे संचलन राजीव बजाज यांनी केले तसेच सुरेश जी खंडेलवाल विजय जानी सर आणि संपूर्ण गोरक्षण चा स्टाफ आणि अवध मार्केटिंग स्टाफ मित्रपरिवार उपस्थित होते.
ह्या वेळी स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन चे अध्यक्ष श्री रविंद्र फाटे यांनी प्रत्येकांना वाढदिवसाचे शुभेच्छा सोबत एक सन्मानपत्र देण्यात आले.
या कार्यक्रमाला सर्व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.