जळगावच्या पाचोरा शहरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 7 नराधमांनी वारंवार बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आजीच्या तक्रारीवरून विनयभंग, सामूहिक बलात्कार आदी कलमांसह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुली बेपत्ता असल्याची तक्रार आजीने केली. तिचा शोध लागल्यानंतर अल्पवयीनवर बलात्कार झाल्याचे समोर आले. तसेच वैद्यकीय तपासणीनंतर ती गर्भवती असल्याचे निदान झाले. या प्रकरणी पोलिसांनी 7 संशयित आरोपींना अटक केली आहे.