अकोला : स्थानिक बुलडाणा अर्बन क्रिएटिव्ह ग्रुप, बुलढाणा आणि सप्तसूर ग्रुप, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला ह्या राष्ट्रीय कृत सामाजिक संस्थेच्या मदतीसाठी "गाता रहे मेरा दिल" हिंदी सुरेल गीताचा नजराणा "एक हात मदतीचा" हा संगीतमय कार्यक्रम ३१ मे २०२५ रोजी हॉटेल शगुण,अकोला येथे संपन्न झाला .
ह्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन
प्रा .संजय खडसे (उपविभागीय अधिकारी), श्री.गजानन शेळके ( डीवायएसपी), श्री.अजय भाऊ सेंगर (पालक संचालक), डॉ.विशाल कोरडे (संस्थापक अध्यक्ष,दिव्यांग सोशल फाउंडेशन),श्री. राजेश लोहिया (सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ), श्री.बाबाराव अरखराव ( SDO परत वाडा) ,श्री .मनोज केदारे (ठाणेदार ,खदान पोलिस स्टेशन), श्री. ब्रम्हेश जोशी ( संचालक उत्कर्ष कोचिंग क्लासेस) ,श्री.अनिल भुतडा(स्थानिक संचालक बुलडाणा अर्बन), श्री.सतीश भुतडा( बुलडाणा अर्बन),श्री. संतोष अग्रवाल ( सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक) ,श्री. जितेंद्र तिवारी (महानगर पालिका अधिकारी) ,श्री.भूषण ताजने ह्यांची उपस्थीती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेले श्री. अनंताभाऊ देशपांडे (द व्हाइस ऑफ लता) यांनी जब प्यार किया तो डरना क्या, इंन्ही लोगो ने, घर आया परदेसी तसेच सिने अभिनेत्री व पार्श्वगायिका दीपाली देसाई ह्यांनी जाने क्या लोग मोहब्बत, पिया तु अब तो आजा, जानू मेरी जान, जब छाये मेरा जादु अशी एक से एक सुरेल गीते सादर केलीत . सह-गायक कलावंत सीमा मोहोळ, उमेश आजनकर, सुभाष साबळे, दिनकर पांडे, मुरली खिलराणी आणि नृत्यविष्कार प्रकाश मेश्राम व संच यांच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी दाद दिली.
संगीत संयोजक प्रशांत ठाकरे व रामेश्वर काळे ह्यांच्या वाद्यवृंद प्रस्तुतीने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमात श्री.अजय सेंगर, श्री.अनंत देशपांडे व श्री. राजेश लोहिया(यांचे विशेष आर्थिक सहकार्य) यांच्या हस्ते दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या सामाजिक उपक्रमासाठी धनादेश देण्यात आला. सदर आर्थिक सहकार्यातून दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य दिले जाईल. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे ह्यांनी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नरेंद्र राजपूत ,बुलढाणा व श्री .गणेश देशमुख ,अकोला यांनी केले. कार्यक्रमात बुलडाणा अर्बन चे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल दळवी,
बुलडाणा अर्बन चे इव्हेंट मॅनेजर सतीश रुद्रकार,विभागातील शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्विते साठी अथक परिश्रम घेतले. सदर सामाजिक उपक्रमाचे कौतुक संपूर्ण अकोला जिल्ह्यात केले जात आहे .
आपल्या प्रतिक्रिया द्या....