कारंजा - श्रीनाथ योगाश्रम रामगाव (रामेश्वर) तालुका दारव्हा येथे सिद्ध सद्गुरु रामनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त सिध्द सदगुरू शांती नाथजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व प्रेरणेने रक्तदान शिबिर व मोफत होमिओपॅथी चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. हरिदास मुंडे, जनसंपर्क अधिकारी सचिन दंडे, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सुनीता डाकोरे, रक्तपेढी परिषद लक्ष्मण काळे ,वाहन चालक तुळशीराम कड,वाशिम,व डाॅ. सौ.सुषमा उपाध्ये व डाॅ. वासनिक कारंजा या वैद्यकीय अधिकारी यांनी आपली सेवा दिली.

तसेच होमिओपॅथी चिकीत्सक.डॉ.वासुदेव कमळे यवतमाळ,डॉ.सौ.उझमानाझ खान, डॉ. सौ मीथीला होरे,यवतमाळ यांनी मोफत सेवा दिली. तसेच अनेक नागरिकांनी आपली होमिओपॅथी द्वारे चिकित्सा करून रोग निदान करून औषध उपचार करून घेतले . या कार्यक्रमात विस रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले.या शिबिरात शुभम संजय देशकरी, पंकज नागोराव गावंडे, सुधीर निरज देशकरी, गोपाल भास्कर देशकरी , राजु रामचंद्र बुटले, प्रफुल नाना कुकडे, ओम राजेश ठाकरे, हितेश राजेंद्र राऊत, संतोष विष्णु ठाकरे, दत्तात्रय गहणीनाथ फुंदे, सुनिल विठ्ठलराव राऊत, अक्षय बबनराव कानकिरड, गिरीष विजयराव महल्ले, ऋषिकेष दत्ता महल्ले, विपूल सुभाषराव चौधरी, शिवम विजय कोल्हे, महेश दत्तात्रय फुंदे, पंकज संजय दहापुते, योगीनाथ अजाबराव चौधरी , गोपालनाथ गुरू शांतीनाथजी महाराज इत्यादी रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिराची नोंदणी श्री. गोपालनाथ गुरू शांतीनाथजी महाराज, ऋषिकेश महल्ले, महेश फुंदे, ज्ञानदेव लोडम, घनश्याम गावंडे, अभिजित चौधरी, पंकज गावंडे, राजीवभाऊ भेंडे, राजु बूटले यांच्या मार्फत करण्यात आली तसेच अनेकांनी स्वयंम स्फूर्तीने शिबिरात रक्तदान केले.पुण्यतिथी निमित्त आयोजीत या कार्यक्रमास उपस्थित सर्व भक्त, सेवेकरी, नागरीक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. येथील महाप्रसाद श्री.चेतन माणिकराव धोटे रा. कारंजा व श्री शिवम विजयराव कोल्हे रा. कारंजा यांच्या मार्फत होता. कार्यक्रमास पंचक्रोशितील नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमात या मठातील महाराज मंडळी उपस्थित होते. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....