वाशिम: आगामी कावड यात्रा, पोळा,श्री गणेशोत्सव,ईद ए मिलाद आणि श्री नवदुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून,जि.पो.अ. कार्यालय येथील कर्तव्य सदन सभागृहात जिल्ह्यातील शांतता समिती सदस्य,विविध मंडळाचे तरुण कार्यकर्ते पदाधिकारी,पत्रकार यांची शांतता समन्वय समिती बैठक घेण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा पोलीस अधिक्षक अनुजजी तारे सर होते.तर प्रमुख उपस्थिती मध्ये अप्पर पोलीस अधिक्षक भारत तांगडे सर होते. यावेळी बोलतांना जि.पो.अ. अनुज तारे म्हणाले, आगामी सण आणि उत्सव सर्वांनी आनंदोत्साहात आणि कायद्याचे भान ठेवून साजरे करावे.पोलीस तुमच्या सेवेसाठी कार्यरत आहे. तसेच महत्वाचे म्हणजे सण आणि उत्सवात डी जे चा वापर टाळून पारंपारिक वाद्यांवर भर द्या.मागील वर्षी कारंजा येथे डी जे च्या दणदणाटाने अनेक लोकांच्या कानाचे पडदे फाटले. डोणगावकर हॉस्पिटल, कांत हॉस्पिटल मधील रुग्नांना त्याचा त्रास झाला. शिवाय काही माजी नगराध्यक्ष विजय बगडे तथा अन्य व्यक्तीच्या घराच्या भिंतीला तडे जाणे,छत पडणे अशा दुर्घटना घडलेल्या आहेत त्यामुळे त्याची पुनरावृत्ती परत कोठेही होणार नाही.यासाठी डीजे वर नियंत्रण ठेवण्याचे आणि शक्यतोवर पारंपारिक वाद्य वाजविण्याचे त्यांनी आवाहन केले.या प्रसंगी कारंजा, कामरगाव,मानोरा,मालेगाव, वाशिम,मालेगाव,रिसोड,शिरपूर येथून अनेक कावळयात्रा, गणेशोत्सव मंडळाचे आणि शांतता समन्वय समितीचे सर्वधर्मिय पदाधिकारी,तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बैठकीकरीता गेलेले शांतता समिती सदस्य संजय कडोळे, दिलीप रोकडे, जहीर भाई, महादेवराव ठोंबरे, प्रदिप वानखडे, उमेश अनासाने, आदींनी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक अनुजजी तारे साहेब यांना त्यांच्या यशस्वी सेवेबद्दल नुकताच राष्ट्रपती-पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे कारंजा वासीयांच्या वतीने अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी आपल्या मनोगतातून बोलतांना ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे आणि सामाजिक कार्यकर्ते दिलीप रोकडे यांनी, आमचे कारंजा शहर शांती,सदभावना व सर्वधर्मिय एकात्मतेचे प्रतिक असून कारंजावासीयांचे सदैव पोलीस प्रशासनाला सहकार्य असते आणि महत्वाचे म्हणजे येथील हिंदु मुस्लिम बांधव एकमेकाच्या सण उत्सवात भाग घेऊन सामोपचारे सण उत्सव साजरे करतात. ही आमच्या शहराची परंपरा असल्याचे सांगितले. तसेच संजय कडोळे म्हणाले, येथील दत्तावतार श्रीगुरू मंदिर संस्थान आणि जैन धर्मियांच्या तिर्थस्थळाला देशविदेशातील शेकडो भाविक भेटी देत असतात. त्यामुळे त्यांची वाहने या परिसरात धावतात.त्याचप्रमाणे या परिसरात मुला मुलींचे सहा सात विद्यालय महाविद्यालय असल्यामुळे शाळा सुटण्याचे वेळेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते त्यामुळे येथील चौका चौकात शाळा सुटण्याचे वेळेवर सकाळी 11 :00 ते 12:30 आणि सांयकाळी 04:30 ते 05:30 पर्यंत,पोलीस प्रशासन आणि गृहरक्षक दलाच्या गार्डचा बंदोबस्त ठेवण्याची विनंती केली. याप्रसंगी उपस्थित शांतता समिती सदस्यांनी एकमेकांना सण उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कारंजा पोलीस स्टेशनचे कर्तव्यतत्पर पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला सर यांच्या वतीने गुप्तचर विभागाचे पोकॉ मिथुन सोनोने तथा उमेश चचाने यांनी कारंजातील शांतता समिती सदस्यांची वाशीम येणेजाणे आणि भोजनाची व्यवस्था केली होती. त्याबद्दल सर्व सदस्यांनी पोलीस स्टेशनचे आभार मानले.