आरमोरी शहर गणेशोत्सव व दुर्गउत्सव साठी प्रसिद्ध आहे त्यात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक मंडळे तयार राहतात.परंतु स्थानिक नगरपरिषद आरमोरी यांनी अनेक ठिकाणी मुताऱ्या बांधलेल्या आहेत.
मात्र भगतसिंग चौकातील जुनीच अडचण पुन्हा चव्हाट्यावर येत आहे आणि त्या चौकात नगर परिषद आरमोरी येथील नगर परिषद पदाधिकारी यांच्या प्रेरणेने गणेशोत्सव सुरू आहे त्यात भाविकांची गैर सोय होत आहे आणि दुर्गा उत्सव येत आहे काही भाविकांनी ही अडचण नगरसेवक मिलिंद खोब्रागडे यांच्याकडे मांडली असता वरील समस्यायकडे नगर परिषद दुर्लक्ष करत आहे व नियोजनशून्य आराखड्यामुळे आणि निष्काळजीपणा दिसून येत आहे असे मत नगर सेवक मिलिंद खोब्रागडे यांनी म्हटले आहे.
याकडे कधी नगर परिषद आरमोरी लक्ष देईल हा प्रश्न अनुत्तरित आहे.