वाशीम : स्वामी समर्थ नगर वासियांनी गुरुदेव सेवा मंडळाचे व्यसनमुक्ती सम्राट हभप लोमेश पाटील चौधरी यांचे अध्यक्षतेखाली , उदघाटक व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त संजय कडोळे तथा व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त युवा पत्रकार निलेश सोमाणी यांचे प्रमुख उपस्थितीत, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ शाळा केकतउमराचे शिक्षक रामेश्वर पचांगे यांनी छोटेखानी कार्यक्रम घेऊन, विद्यार्थ्यांना तंबाखू मुक्तीची शपथ देत गुटखा, तंबाखू पासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले . यावेळी कारंजा येथील संजय कडोळे यांनी व्यसनमुक्ती कार्याबदल त्यांचा श्री नृसिह सरस्वती स्वामीची प्रतिमा देऊन सन्मान केला . याप्रसंगी दिपक गोरे, कैलास सुर्यवशी, राजू काळे, शिवा पचांगे, धनंजय पचांगे इत्यादी हजर होते . पत्रकार निलेश सोमाणी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना , " युवाशक्ती व्यसनमुक्त राहिल्यास आपला समाज सशक्त समाज राहून उत्तरोत्तर प्रगती करेल " असे सांगीतले .