वर्धा : प्रथमतःच विदर्भात आगमन झालेल्या, श्री पंचमुखी हनुमान आश्रम, इंदोरे, खंबारे, त्र्यंबकेश्वर रोड, नाशिक येथील मठाधिश असलेल्या,महंत भगवददास त्यागी सिद्ध साध्वी श्री श्री विजयादेवीजी दिदी यांचा श्री तुलसीदास विरचित, श्रीरामचरितमानस ग्रंथावर आधारीत संगीतमय श्री श्रीरामकथा प्रवचन सप्ताह,ग्राम मांडवा ता.जि.वर्धा येथे सुरु असून,संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या सुमधूर अशा अमृततुल्य वाणीतून होत असलेल्या संगीतमय प्रवचनाला शिष्य मंडळीसह वर्धा जिल्ह्यातील लाखो श्रीराम भाविकभक्त रसिक श्रोत्यांची गर्दी होत आहे.याबाबत महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना मिळालेले सविस्तर वृत्त असे की, श्री हनुमान मंदिर मांडवा जि . वर्धा आणि मांडवा ग्राम वासियां कडून, प्रभू श्रीरामचंद्र यांच्या श्रीरामनवमी आणि श्री हनुमान जन्मोत्सवाच्या महापर्वावर दि. २९ मार्च ते दि. ७ एप्रिल पर्यंत दररोज सायं. ०५:०० ते रात्री ०९:३० पर्यंत,महंत साध्वी श्री विजयादेवी दिदी यांच्या श्रीराम कथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आलेले असून त्यानिमित्ताने दि.२९ मार्च रोजी तिर्थस्थापना करण्यात आली.

उल्लेखनिय असे की,परमपूज्य महंत साध्वी श्री श्री विजयादेवी दिदी यांचे आगमन होताच समस्त मांडवावासीयांनी टाळ मृदंगाच्या गजरात, नऊवार पातळातील शेकडो बालिकांनी गुलाब पुष्पांची उधळण करून नगरपरिक्रमा करीत भव्य दिंडी काढून दिंदीचे स्वागत केले.

दि.३० मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दि.३१ मार्च रोजी श्री गुरुदेव महिला मंडळाचे भजन, दि.१ एप्रिल रोजी सकाळी ११ : ०० ते दिवसभर कस्तुरबा रुग्नालय सेवाग्राम कडून वैद्यकीय तपासणी व उपचार, दि. २ एप्रिल रोजी श्री वारकरी महिला मंडळ, परसोंडी ( टेंभरी ) यांचे भजन, दि. ३ एप्रिल रोजी सकाळी १०:३० ते दिवसभर श्री गुरुदेव आयुर्वेदिक रुग्नालय,गुरुकुंज आश्रम मोझरी जि.अमरावती द्वारे आयुर्वेदिक वैद्यकिय तपासणी व उपचार ; दि.४ एप्रिल रोजी श्री गुरुदेव सेवा मंडळ मांडवा यांचे खंजेरी भजन; दि.५ एप्रिल रोजी कृषी विभाग वर्धाच्या वतीने भव्य असे कृषी संमेलन ; दि.६ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव, होमहवन व मांडवा गावामधून भव्य अशी ग्रंथदिंडी ; दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजता राष्ट्रिय किर्तनकार हभप. प्रकाश महाराज वाघ,वर्धा यांचे गोपालकाल्याचे किर्तन व दुपारी ३:०० वाजे पासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले असून, बाहेरगावाहून येणाऱ्या श्रीरामभक्त भाविक मंडळींची भोजन व निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्या सुंदर अशा प्रवचनामधून महंत साध्वी यांनी " मानवानाने गृहस्थाश्रमात राहून,एकवचनी,एकपत्नी,धर्मनिष्ठ जीवन जगून, मातापित्याची सेवा करीत मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्रासारखा आदर्श ठेवून, चारित्र्यवान जीवन जगण्याचा उपदेश दिला आहे. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....