वाशिम : हवामान विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे,बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रापासून,संपूर्ण महाराष्ट्रावर सद्यस्थितीत,कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन कमी अधिक प्रमाणात वादळी वारे वहात आहेत.त्याचाच परिणाम म्हणून सर्वत्र पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण तयार झाले असून येत्या आठवड्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगीतले.सद्यस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राच्या कोकण,पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा,विदर्भावर अवकाळीचे ढग घोंघावत आहेत.त्यामुळे येत्या आठवड्यात संपूर्ण विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात काही भाग सोडून,कमी अधिक प्रमाणात पूर्वमोसमी अवकाळी पाऊस होणारच असल्याचे अनुमान हवामान तज्ञाकडून जाहिर करण्यात आल्याचे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.वादळी पावसात चक्रवात,गारपिट,विजा कोसळणे असे प्रकार होण्याची शक्यता गृहीत धरून, शेतकऱ्यांनी शेतातील कामे उरकवावीत.पावसाळी वातावरण दिसताच काळजीने घराकडे परतावे.विजेच्या कडकडाटात झाडाखाली किंवा शेतात उघड्यावर थांबू नये.आपली गुरेढोरे,शेळ्यामेंढ्या शेतात झाडाखाली किंवा उघड्यावर बसवू नये.विजेचा कडकडाट होत असतांना घरातच थांबावे.घराबाहेर पडून रस्त्यावर येऊ नये.विजेची उपकरणे व आपले मोबाईल बंद ठेवावे. असे आवाहन करण्यात येत असून सद्यस्थितीत भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर, अमरावती,अकोला,वाशिम या जिल्ह्यात येत्या आठ दिवस पर्यंत कमिअधिक प्रमाणात, भाग बदलून अवकाळी पाऊस होण्याचा इशारा देण्यात आल्याचे संजय कडोळे यांनी हवामान विभागाच्या हवाल्याने कळवीले आहे.