मणिपूर येथे मागील तीन महिन्यापासून सामुहिक, जातीय हिंसाचाराच्या घटनांमुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला भारत देश हादरून गेलेला आहे. अशा घटनांमुळे देशातच नाहीतर संपूर्ण जगात सुद्धा भारताची प्रतिमा मलिन झालेली आहे. तसेच या हिंसक घटना उत्तरोक्त वाढतच चालल्या आहेत. अशातच हिंसक जमावाने दोन निरापराध महिलांची सामूहिक नग्न धिंड काढून त्यांच्यावर जे अमानवीय अत्त्याचार केले, ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे.
अशा आणीबाणीच्या वेळी संवैधानिक जबाबदारी पायदळी तुळवत राज्य व केंद्रीय सरकार हे अत्याचार सत्र उघळ्या डोळ्यांनी बघत बसली आहे. ह्या अमानुष अत्याचार मालिकेचा व त्यांच्या पाठीराख्यांविरुद्ध ब्रम्हपुरी जनतेमध्ये प्रचंड संताप व आक्रोश निर्माण झालेला आहे. त्यामुळे विविध पक्ष व सामाजिक संघटना चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन 27 जुलै रोजी मा.प्रा.सुभाष बजाज यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक विश्राम गृह येथे बैठक घेऊन आम्ही भारतीय लोक या बॅनर खाली 7 ऑगस्ट 2023 रोजी SDO कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे.यामधे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत ज्या मध्ये मणिपूर येथे महिलांची निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या झुंडीतील सर्व नराधमांना आणी शेकडोंच्यावर निरपराध नागरिकांची निर्घून हत्या करणाऱ्या,जाळपोळ करून घरादारांची राख रांगोळी करून लोकांचे जीवन उध्वस्त करणाऱ्या सर्व नराधमांना त्वरित अटक करून कुठलाही मुलाहिजा न बाळगता तत्परतेने फाशी ( Hang Till Death) देण्यात यावी.
मणिपूर राज्यातील जातीवादी दंगलखोर एन. बिरेन सिंग सरकारला त्वरित प्रभावाने बरखास्त करून तिथे राष्ट्रापती राजवट (President Rule) लागू करण्यात यावी.
मणिपूर राज्यातील हिंसक आणी भयावह परिस्थिती पहिल्या दिवसाच्या पहिल्या क्षणापासून माहिती असून सुद्धा त्यात हस्तक्षेप करून कसलीही प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता स्त्रियांची व निरपराध नागरिकांची हत्या घडू देणाऱ्या आणी जगभरात आपल्या भारत राष्ट्राची प्रतिमा कलंकित करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ताबडतोब राजिनामा द्यावा.
बेजबाबदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा देउन पदावरून पायउतार व्हावे .
अचानकपने मैतेई समुदायाला नोटीफाइड ट्राइब घोषित करण्याबाबत मणीपूर राज्य शासनाला मणीपूर हायकोर्टाने आदेश दिला. तेव्हापासून अमानवीय हिंसाचारांची सुरुवात झाली. हा आदेश अचानकपणे पारीत करणाऱ्या न्यायाधिशांच्या हेतूची सखोल चौकशी करुन सत्य बाहेर काढन्यात यावे यासह अन्य मागण्या करण्यात येणार आहेत .
तेव्हा आयोजित निषेध मोर्च्यात सकाळी 11 वाजता राजीव गांधी भवन कूर्झा रोड येथे हजारोच्या संख्येने तालुक्यातील बंधू आणि भगिनींनो उपस्थित राहून सहभागी होण्याचे आवाहन आम्ही भारतीय लोक समितीचे निमंत्रक विनोद झोडगे,प्रशांत डांगे,अमित कन्नाके, सुधा राऊत,प्रा. हरीचंद्र चोले सर व ईतर पदाधिकारी यांनी केले आहे.