कारंजा : स्थानिक गांधी चौक येथील चुनापूरा येथील, उमेश अनासाने यांच्या बालाजी ज्वेलर्स येथे, महाराष्ट्र करंजमहात्म्य पत्रकार परिषद आणि साप्ताहिक करंज महात्म्य कार्यालयाचे उदघाटन थाटात संपन्न झाले . यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी उदघाटक म्हणून कारंजा मतदार संघाचे आ. राजेंद्र पाटणी तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संजय किटे हे होते . तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आ. ऍड किरणराव सरनाईक, अक्षय बाप्पू देशमुख, संजय भेंडे,माजी सरपंच प्रदिप वानखडे,कृष्णराव देशमुख होते. यावेळी आपल्या मनोगतातून बोलतांना उमेश अनासाने यांनी, "कारंजेकरांच्या विविध अडीअडचणी, समस्या सोडविण्या करीता साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्र सुरु करण्यात आलेले असून, महाराष्ट्र करंजमहात्म्य पत्रकार परिषद स्थापन करण्यात आलेली असून आज कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येत असल्याचे सांगीतले."

यावर बोलतांना आ. राजेंद्र पाटणी म्हणाले, वाचक रसिकांच्या पहिल्या पसंतीचे ठरलेल्या साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्र कार्यालयाचे आमच्या हस्ते उद्घाटन होत असल्याबद्दल आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. तर प्रमुख पाहुणे अमरावती विधानपरिषद मतदार संघाचे शिक्षक आमदार यांनी सर्वप्रथम, साप्ता . करंजमहात्म्य कार्यालया समोरील, पवित्र दर्ग्याची चौकशी करून, हजरत लाल इमाम साहब ( रहेमतुल्ला अलैय ) यांच्या दरगाहचे दर्शन घेऊन प्रार्थना केली .

यावेळी त्यांचे सोबत आ. अमित झनक यांचे प्रतिनिधी काँग्रेस पदाधिकारी डॉ. कृष्णराव देशमुख, साप्ता . करंजमहात्म्यचे संपादक, सर्वधर्म समभाव मित्र मंडळाचे संजय कडोळे, कार्यालय प्रमुख उमेश अनासाने, विजय खंडार हे होते. यावेळी महात्मा गांधी चौकातील बहुसंख्य मुस्लिम बांधवांनी आनंद व्यक्त केला. आ. ऍड. किरणराव सरनाईक यांनी, "मी दर आठवड्याला आवडीने साप्ता . करंजमहात्म्य वाचत असल्याचे सांगून, वृत्तपत्राचे स्वतः संजय कडोळे यांनी लिहीलेले अग्रलेख, बातम्या वृत्तपत्राची सुबक मांडणी व वाचक संख्या बघून संपादक संजय कडोळे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्यात. कोणत्याही शासकिय जाहिराती शिवाय सातत्य कायम ठेवून करंज महात्म्य सुरु आहे . हा त्यांच्या वृत्तपत्राच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगीतले ." याप्रसंगी संपादक संजय कडोळे आणि सहसंपादक तथा कार्यालय प्रमुख उमेश अनासाने यांची मुस्लिम समाजाची शेकडो मित्रमंडळी एकत्र जमली होती.

कार्यालय प्रमुख सहसंपादक उमेश अनासाने, डॉ. संजय किटे,दिलीप आप्पा बेन्द्रे, अमोल काळे, सदानंद वानखडे, महेश जवाहरमालाणी ,शेख हमजा, अनिस अहमद, काजी रफिउल्लाह, कलिमखॉ साहब, मोहम्मद मुश्ताक यांनी आमदार राजेन्द्र पाटणी, आमदार ऍड किरणराव सरनाईक यांचे हर्षोल्हासात स्वागत केले. आभार प्रदर्शन करतांना संजय कडोळे म्हणाले की, "गांधी चौकातीलच नव्हे तर संपूर्ण कारंजा शहरातील मुस्लिम समाज आम्हाला वेळोवेळी मानसन्मान देतो आणि प्रोत्साहित करतो हे आमच्या यशाचे श्रेय आहे. त्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून सोडविण्याकरीता आणि बातमीदार जाहिरातदार यांच्या सोयी करीता शहरातील मध्यवर्ती ठिकाणी साता. करंजमहात्म्य कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेले असून, आमच्याकडे येणाऱ्या बातम्या तक्रारीची लगेच दखल घेतली जाईल असे स्पष्ट करीत कार्यक्रमाचे उद्घाटक आ राजेंद्र पाटणी, आ. सरनाईक यांचे व उपस्थितांचे मनापासून आभार मानले .
आपल्या प्रतिक्रिया द्या....